सार

जगाला यशाचा मंत्र देणाऱ्या विवेक बिंद्रा यांच्या खऱ्या आयुष्यातील एक धक्कादायक सत्य उघडकीस आले आहे. बिंद्रा यांनी आपल्या पत्नीला बेदम मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे.

Vivek Bindra FIR : मोटिव्हेशनल स्पीकर (Motivational Speaker) विवेक बिंद्रा यांच्यावर पत्नीला बेदम मारहाण केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. या प्रकरणात बिंद्रा यांच्याविरोधात एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. 6 डिसेंबर 2023 रोजी विवेक बिंद्रा यांचा विवाह झाला होता. लग्नाच्या काही दिवसानंतरच बिंद्रा यांनी पत्नीला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

पीडित महिलेचा भाऊ वैभव याने उत्तर प्रदेशातील नोएडा सेक्टर 126 च्या पोलीस स्थानकात विवेक बिंद्रा यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. वैभवच्या तक्रारीवरून पोलिसांनी बिंद्रा यांच्यावर कलम 323, 504, 427 आणि 325 अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. 

वैभवने पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले की, विवेक बिंद्रा यांनी त्याच्या बहिणीला एका खोलीत बंद करून ठेवले होते. याशिवाय तिला शिवीगाळही करत बेदम मारहाण केली. बहिणीला मारहाण केल्याने तिच्या कानाचा पडदाही फाटल्याचे भावाने सांगितले.

नक्की काय घडले? 
विवेक बिंद्रा यांनी लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी पत्नीला बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे. यामुळे पीडित महिलेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पीडित महिलेच्या भावाने आपल्या तक्रारीत हे देखील म्हटले की, “7 डिसेंबरला (2023) बिंद्रा हे त्यांच्या आईसोबत वाद घालत होते.यादरम्यान बहिणीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता तिला एका खोलीत बंद करून ठेवले. त्यानंतर तिला शिवीगाळ करत मारहाणही केले. यामुळे बहिणीला गंभीर दुखापत झाली आहे.”

आणखी वाचा: 

Savitri Jindal : देशातील सर्वात श्रीमंत महिला, कमाईमध्ये अंबानी-अदानींनाही सोडले मागे

Shocking! गावकरी कुलदेवता मानून पूजा करायचे, वैज्ञानिकांच्या तपासात धक्कादायक सत्य आले समोर

Covid 19 Update : कर्नाटकात वाढतोय कोरोनाचा प्रादुर्भाव, ज्येष्ठांना मास्क लावण्याचा सूचना