सार
डिसेंबर, 2023 पूर्वी काही महत्त्वाची कामे पूर्ण करणे गरजेचे आहे. यामध्ये इन्कम टॅक्स रिटर्न असो किंवा बँक लॉकरसंदर्भातील एखादे काम असो ते येत्या 31 डिसेंबरआधी पूर्ण करून घ्या.
31st December Deadline Alert : डिसेंबर (2023) महिना संपण्यास अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. यानंतर नवं वर्ष 2024 सुरू होणार आहे. अशातच 31 डिसेंबरपूर्वी काही महत्त्वाचे कामे उरकून घ्या. अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते. यंदाचे वर्ष संपण्याआधी तुम्ही कोणती कामे केली पाहिजेत याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...
इन्कम टॅक्स रिटर्न
आर्थिक वर्ष (Financial Year) 2022-23 म्हणजेच मूल्यांकन वर्ष (Assessment Year) 2023-24साठी इन्कम टॅक्स रिटर्नची (Income Tax Return) अंतिम तारीख 31 जुलै,2023 होती. पण या तारखेपर्यंत ज्या नागरिकांनी आयटीआर फाइल केला नसल्यास 31 डिसेंबरपर्यंत (2023) करावा.
बँक लॉकर
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) लॉकर अॅग्रिमेंटसाठी 31 डिसेंबर, 2023 पर्यंतची मुदत दिली आहे. तुम्ही 31 डिसेंबर, 2022 किंवा त्याआधी सुधारीत बँक लॉकर अॅग्रिमेंट दाखल केले असल्यास अपडेटेड अॅग्रिमेंट द्यावे लागेल.
म्युचअल फंड-डिमॅट अकाउंट नॉमिनेशन
तुम्ही म्युचअल फंडात (Mutual Fund) गुंतवणूक किंवा तुमचे डिमॅट अकाउंट (Demat Account) असल्यास येत्या 31 डिसेंबर (2023) पर्यंत खात्यासाठी नॉमिनीची (Nominee) प्रक्रिया पूर्ण करून घ्या. अन्यथा तुमचे म्युचअल फंड आणि डीमॅट अकाउंट फ्रीज होऊ शकते.
युपीआय आयडी
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) गुगल पे, फोन पे अथवा पेटीएम सारख्या युपीआय आयडीला (UPI ID) निष्क्रिय (Inactive) करण्यास सांगितले आहे. खरंतर असे युपीआय आयडी निष्क्रिय करायचे आहेत जे एका वर्षांपासून सक्रिय नाहीत. यासाठी 31 डिसेंबर, 2023 ही अंतिम तारीख देण्यात आली आहे.
आयडीबीआय बँक एफडी
आयडीबीआय बँकेने (IDBI Bank) दोन कोटी रूपांपेक्षा कमी रक्कमेची एफडीच्या (Fixed Deposite) योजनेवरील व्याज दरात बदल केला आहे. यासोबत बँकेने स्पेशल डिपॉझिट स्किम अमृत मोहोत्सव (Amrit Mahotsav Scheme) एफडीची मुदत 31 डिसेंबर (2023) केली आहे.
एसबीआय बँकेचे गृह कर्ज
एसबीआय बँकेचे गृह कर्ज (SBI Bank Home Loan) स्वस्त दरात हवे असल्यास 31 डिसेंबर, 2023 पर्यंत यासाठी अखेरची तारीख आहे. गृह कर्जावर सर्वसामान्यपणे व्याज दर हा सिबिल स्कोरच्या (CIBIL Score) आधारावर 0.65 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाते.
इंडियन बँकेची स्पेशल एफडी
इंडियन बँकेच्या (Indian Bank) एफडी आयएनडी सुपर 400 (IND Super 400) आणि आयएनडी सुप्रीम 300 (IND Supreme 300) याची मुदत तारीख 31 डिसेंबर, 2023 पर्यंत आहे. या एफडीच्या रेग्युलर ग्राहकांना 7.05 टक्के आणि जेष्ठ नागरिकांना 7.55 टक्के व्याज या एफडीवर दिले जाते.
एसबीआयची अमृत कलश योजना
एसबीआय बँकेचे अमृत कलश योजनेची (Amrit Kalash Scheme) मुदत 31 डिसेंबर, 2023 पर्यंत आहे. 400 दिवसांच्या या एफडीवर कमीतकमी 7.60 टक्क्यांनी व्याज दिले जाते.
आणखी वाचा:
मोटिव्हेशनल स्पीकर विवेक बिंद्रा यांच्या विरोधात FIR दाखल, पत्नीला बेदम मारहाण केल्याचा आरोप