ईडीकडून काँग्रेसमधील दिग्गज नेत्याची चौकशी केली जाणार, 20 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यासंबंधित प्रकरण

| Published : Mar 18 2024, 02:55 PM IST / Updated: Mar 18 2024, 02:58 PM IST

ED

सार

लोकसभा निवडणुकीआधी ईडीकडून काँग्रेसमधील एका दिग्गज नेत्याची चौकशी केली जाणार आहे. खरंतर, ईडीकडून 20 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी चौकशी केली जाणार आहे.

Rajasthan : राजस्थानची राजधानी जयपुर (Jaipur) येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. ईडीकडून जल जीवन मोहीमेत (Jal Jeevan Mission) 2 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणात माजी मंत्री महेश जोशी (Mahesh Joshi) यांना चौकशीसाठी बोलावले आहे. याआधी जल जीवन मोहिमेतील कंत्राटदार संजय बाफना आणि अन्य काही जणांची तीन दिवसांपासून जयपुरमध्येच चौकशी केली जात आहे.

माजी मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय महेश जोशी
ईडीने सोमवारी (18 मार्च) महेश जोशी यांची चौकशी केली. जोशी यांच्या निवासस्थानासह कार्यालयाच्या ठिकाणी ईडीने धाडी टाकल्या आहेत. खरंतर, महेश जोशी माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे निकटवर्तीय आहेत. महेश जोशी यांच्यावर काही विभागांची जबाबदारी आहे.

काँग्रेसमधून निवडणूक लढण्याची शक्यता
राजस्थानमध्ये (Congress) पुढील महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीआधी महेश जोशी यांच्या चौकशीला फार महत्त्व दिले जात आहे. महेश जोशी यांना काँग्रेसकडून लोकसभेसाठी तिकिट दिले जाऊ शकते. सूत्रांनुसार, राजस्थानमध्ये लोकसभेच्या 25 जागांवर तिकिट दिले जाऊ शकते. अशातच महेश जोशी यांना लोकसभेसाठी एक योग्य आणि प्रबळ दावेदार मानले जात आहे. दरम्यान, जोशी यांना जयपुर येथून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा : 

Telangana : तेलंगणातील राज्यपालांचा राजीनामा, पॉंडिचेरी येथून लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता

Tax Savings : आर्थिक वर्ष 2024-25 साठी कर बचत आयडिया : कलम 80C चे 5 पर्याय

Electoral Bonds : निवडणूक रोख्यांची लपवाछपवी न करता संपूर्ण माहिती SBI ने द्यावी, सुप्रीम कोर्टाचे बँकेला आदेश