सार
कोलकाता विमानतळावर सुरक्षारक्षकांनी एका दिव्यांग महिलेसोबत संतापजक वागणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. खरंतर दिव्यांग महिलेला सुरक्षारक्षकांनी चक्क व्हिलचेअरवरुन खाली उतरण्यास सांगितले. यासंदर्भातील एक पोस्ट पीडित महिलेने सोशल मीडियावर केली आहे.
Wheelchair-Bound Woman Asked To Stand Up : कोलकाता विमानतळावरील (Kolkata Airport) सुरक्षारक्षकाने दिव्यांग महिलेसोबत संतापजनक वागणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. आरुषि सिंह असे पीडित महिलेचे नाव आहे. खरंतर आरुषि सिंहला कोलकाता विमानतळावरील एका सुरक्षारक्षकाने व्हिलचेअरवरुन खाली उतरण्यास सांगितले. आरुषिने तिला चालणे शक्य नसल्याचे सांगूनही सुरक्षारक्षकाने तिचे ऐकले नाही. या संदर्भात आता आरुषिने सोशल मीडिवर पोस्ट शेअर केली आहे.
आरुषिने सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट
आरुषिने सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'X'वर काही पोस्ट शेअर केल्या आहेत. पोस्टमध्ये आरुषिने म्हटले, “कोलकाता विमानतळावर सिक्युरिटी क्लिअरेंन्सदरम्यान (Security Clearance) अधिकाऱ्याने मला उभे राहण्यास सांगितले. अधिकाऱ्याने एकदाच नव्हे तीनदा उभे राहा असे सांगितले. अधिकाऱ्याने पहिल्यांदा मला उभे राहण्यासह Kiosk पर्यंत चालण्यास सांगितले.”
पुढील पोस्टमध्ये आरुषिने म्हटले की, “मी अधिकाऱ्याला माझ्या दिव्यांग स्थितीबद्दल सांगितले. तरीही अधिकाऱ्याने मला पुन्हा उभे राहण्यास सांगितले. नकार देऊनही अधिकारी मला उभे राहण्यास सांगत होता.”
खरंतर, व्हिलचेअरवरुन येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर मदत केली जाते. तरीही माझी मदत करण्यात आली नाही. याशिवाय व्हिलचेअरची मदत मिळण्यासाठी 20 मिनिटे वाट पाहावी लागली.
विमानतळावरील सुरक्षारक्षकाची संतापजनक वागणूक
आरुषिने म्हटले की, सुरक्षारक्षकाच्या अशा वागणूकीमुळे त्याच्यामध्ये दयाळूपणा नसल्याचे जाणवले. मला फार राग आला होता. माझ्यासोबत आधी देखील अशीच घटना घडली होती. याशिवाय आरुषिने विमानतळाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करत म्हटले, CISF मॅन्युअल दिव्यांग नागरिकांचा अपमान करण्यास सांगते का?
दरम्यान, कोलकाता विमानतळावरील अधिकाऱ्यांनी दिव्यांग प्रवाशांसोबत केल्या जाणाऱ्या वागणूकीकडे लक्ष देण्याची पुन्हा गरज असल्याचे आरुषिने म्हटले आहे. या घटनेवर अद्याप केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) आणि कोलकाता विमानतळाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
आणखी वाचा :
Delhi Liquor Scam : ईडीच्या पाचव्या समन्सलाही अरविंद केजरीवाल यांनी धुडकावले, AAP पक्षाने म्हटले...
भाजप नेते रंजीत श्रीनिवासन यांच्या हत्येतील 15 जणांना सुनावली फाशीची शिक्षा