Mayank Agarwal Hospitalized : कर्नाटक रणजी संघाचा कर्णधार मयंक अग्रवालची विमानात अचानक बिघडली प्रकृती, ICU मध्ये दाखल

| Published : Jan 31 2024, 11:30 AM IST / Updated: Jan 31 2024, 11:33 AM IST

Indian cricketer Mayank Agarwal, son-in-law of police commissioner, married beautiful wife Aashita Sood after shining in IPL

सार

भारतीय क्रिकेटर मयंक अग्रवाल याची प्रकृती बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशातच मयंक अग्रवाल याची प्रकृती का बिघडली यामागील कारण समोर आले आहे.

Mayank Agarwal Hospitalized : भारतीय संघातील क्रिकेटर आणि कर्नाटक रणजी संघाचा कर्णधार मयंक अग्रवाल याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मयंक विमानातून प्रवास करताना त्याची अचानक प्रकृती बिघडली. मयंकने विमानात प्रवासादरम्यान पाणी प्यायल्याने त्याला त्रास होऊ लागला होता. यामुळे मयंक अग्रवालला आयसीयूत (ICU) दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

या प्रकरणाशी संबंधित व्यक्तींनी म्हटले की, मयंकच्या प्रकृती बिघडण्यासंदर्भात अधिक तपास केला जात आहे. याशिवाय मयंक ज्या बॉटलमधून पाणी प्यायला त्यामध्ये काय होते याबद्दलचा तपास केला जात आहे. सध्या मयंकची प्रकृती स्थिर आहे. मयंकला आयएलएस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

खरंतर क्रिकेटर मयंक रजणी सामना खेळून झाल्यानंतर अगरताला येथून परतत असताना विमानात त्याची प्रकृती बिघडली गेली. मयंकला घश्याला त्रास होत असल्याचे त्याला जाणवू लागले होते. यानंतर तातडीने मयंकला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

नक्की काय घडले?
विमानातील अन्य प्रवाशांनी या घटनेबद्दल माहिती देत म्हटले की, मयंक पाणी प्यायल्याने त्याची अचनाक तब्येत बिघडली गेली. मयंकला जीभ, तोंड आणि घश्यात जळजळ होत असल्याचे वाटू लागले. याशिवाय मयंकला बोलण्यासही त्रात होत होता.

या घटनेनंतर विमानातील क्रू ने पाण्याची बॉटल जप्त केली असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेसंबंधित कर्नाटक रणजी संघ किंवा फ्लाइट क्रू मेंबर्सकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

सूत्र अशी देखील माहिती देतायत, फ्लाइटच्या क्रू ने पाण्याच्या बॉटल्स ठेवण्याच्या ठिकाणी अ‍ॅसिड ठेवले होते. मयंक त्याला पाणी असल्याचे समजून प्यायला. पण पाण्याची चव वेगळी लागल्याने त्याने ते थूंकले. सध्या मयंक डॉक्टरांच्या निगराणीखाली आहे.

2 फेब्रुवारीला पुढील सामना
कर्नाटकातील संघाचा पुढील सामना येत्या 2 फेब्रुवारीला सूरतमध्ये होणार आहे. पण कर्णधार मयंक अग्रवाल या सामन्यात खेळणार की नाही अद्याप स्पष्ट नाही. अन्यथा संघाला मयंक अग्रवाल शिवाय सामना खेळावा लागणार आहे.

आणखी वाचा : 

भारतीय नौसेनच्या जवानांनी 19 पाकिस्तानी नागरिकांचा वाचवला जीव, सोमालियाच्या सागरी चाच्यांनी मच्छिमार जहाजावर मिळवला होता ताबा

ईडीकडून हेमंत सोरेन यांची BMW कार जप्त, दिल्ली विमानतळावरही EDची नजर

भाजप नेते रंजीत श्रीनिवासन यांच्या हत्येतील 15 जणांना सुनावली फाशीची शिक्षा