सार

भाजप नेते रंजीत श्रीनिवासन यांची हत्या करणाऱ्या 15 जणांना केरळातील एका स्थानिक कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. 19 डिसेंबर 2021 रोजी PFI च्या काहीजणांनी रंजीत श्रीनिवासन यांची हत्या केली होती.

Ranjith Sreenivasan Murder Case : केरळमधील (Kerala) एका स्थानिक कोर्टाने भाजप (BJP) नेते रंजीत श्रीनिवासन यांच्या हत्येतील 15 जणांना फाशीची शिक्षा (Death Penalty) सुनावली आहे. भाजपतील ओबीसी विंगचे नेते रंजीत श्रीनिवासन यांची डिसेंबर 2021 रोजी केरळातील अलाप्पुझा (Alappuzha) जिल्ह्यात हत्या करण्यात आली होती.

रंजीत यांच्या हत्येतील दोषी पॉप्युलर फ्रंन्ट ऑफ इंडिया (PFI) संघटनेशी संबंधित आहेत. केरळातील स्थानिक कोर्टाने 15 जणांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. निजाम, अजमल, अनूप, मोहम्मद असलम, सलाम, अब्दुल कलाम, सफरुद्दीन, मुनशाद, जजीब, नवाज, शेमिर, नजीर, जाकिर हुसैन, शाजी आणि शमनाज अशी भाजप नेत्याच्या हत्येतील आरोपींची नावे आहेत.

15 जणांवरील हत्येचा आरोप सिद्ध
20 जानेवारीला कोर्टाने रंजीत श्रीनिवासन यांच्या हत्येतील 15 आरोपींपैकी आठजणांचा हत्येत थेट हात असल्याचे आढळून आले. अन्य चार जण हत्येतील दोषी ठरले होते. याशिवाय तीन आरोपींना हत्येचा कट रचण्यामध्ये दोषी ठरवण्यात आले होते. कोर्टात आता 15 आरोपींवर हत्येचा आरोप सिद्ध झाला आहे.

डिसेंबर 2021 मध्ये करण्यात आली होती हत्या
19 डिसेंबर 2021 रोजी रंजीत श्रीनिवासन यांची अलाप्पुझा येथील वेलक्कीनार जवळील निवासस्थानी हत्या करण्यात आली होती. हत्येतील आरोपींनी रंजीत श्रीनिवासन यांची हत्या त्यांची आई, पत्नी आणि मुलीच्या उपस्थितीत केली होती.

आणखी वाचा : 

भारतीय नौसेनच्या जवानांनी 19 पाकिस्तानी नागरिकांचा वाचवला जीव, सोमालियाच्या सागरी चाच्यांनी मच्छिमार जहाजावर मिळवला होता ताबा

Shaheed Diwas 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खासगी डायरीत महात्मा गांधींबद्दल लिहिण्यात आल्यात या खास गोष्टी, तुम्हीही वाचा

सरकारने SIMIवर 5 वर्षांची बंदी घातली, केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केला आदेश