कॅडबरी डेअरी मिल्क खाता का? पाहा सोशल मीडियावर व्हायरल झालेले हे Photos आणि ठरवा....

| Published : Apr 29 2024, 02:40 PM IST / Updated: Apr 29 2024, 02:43 PM IST

Cadbury Dairy Milk

सार

बहुतांशजणांना कॅडबरी खायला फार आवडते. पण हैदराबादमधील एका व्यक्तीने कॅडबरी डेअरी मिल्कचे पाकिट उघडले असता त्याला धक्का बसला. या व्यक्तीने सोशल मीडियावर कॅडबरी डेअरी मिल्कचे काही फोटोही शेअर केले आहेत.

Viral Photo of Cadbury Dairy Milk : हैदराबादमधील कॅडबरी डेअरी मिल्कच्या चॉकलेटसंदर्भातीक एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथील व्यक्तीने चॉकलेटचे पाकिट उघडले असता त्याला कॅडबरीला बुरशी लागल्याचे दिसून आले. याचेच काही फोटो व्यक्तीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सोशल मीडियावर फोटो व्हायरल
सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ‘X’ वर @goooofboll नावाच्या अकाउंटवरून कॅडबरी डेअरी मिल्कला बुरशी लागल्याचे काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. फोटोमध्ये दिसतेय की, नरम झालेल्या कॅटबरीला पाठीमागे एक भोक पडले आहे. याशिवाय कॅडबरीच्या पुढील बाजूस बुरशी लागली आहे. खरंतर, कॅडबरीचे उत्पादन जानेवारी 2024 रोजी करण्यात आले होते. पण कॅडबरीची एक्सपायरी वर्षभराआधीच झाली होती.

युजर्सने दिल्या अशा प्रतिक्रिया
एका युजरने म्हटले की, "माझ्यासोबत देखील अशाच प्रकारची घटना घडली होती. मी 100 रुपयांची डेअरी मिल्क कॅडबरी खरेदी केली होती. कॅडबरी खराब असल्याने ती फेकून दिली. या प्रकरणाकडे अधिक गांभीर्याने पाहिले नाही. पण कंपनीने अशा गोष्टींकडे पाहिले पाहिजे." दुसऱ्या युजरने म्हटले की, "काही दुकानदार थंड ठिकाणी कॅडबरी ठेवत नसल्याने त्या नरम होतात." तिसऱ्याने म्हटले की, "दुकानदार कॅडबरी व्यवस्थितीत ठेवत नाहीत." चौथ्याने म्हटले, "तू यासंदर्भात कंज्युमर प्रोटेक्शन कोर्टात धाव घेतली पाहिजे."

कॅडबरी डेअरी मिल्कने दिले उत्तर
कॅडबरी डेअरी मिल्कने बुरशी झालेल्या फोटोंवर उत्तर देत म्हटले की, “आम्ही अशा प्रकारची कॅडबरी तुम्हाला दिल्याबद्दल क्षमस्व आहोत. याशिवाय तुम्ही आम्हाला तुमचे नाव, पत्ता, फोन क्रमांक आणि जेथून कॅडबरी खरेदी केली आहे याची देखील माहिती. यावरून पुढील कार्यवाही करू.”

आणखी वाचा : 

उन्हाळ्यात किती अंडी खावी? अन्यथा होईल नुकसान

उन्हाळ्यात उष्माघातापासून दूर राहण्यासाठी खास टिप्स