अंड्याचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. पण बहुतांशजणांना असा प्रश्न पडतो उन्हाळ्याच्या दिवसात किती अंडी खावी?
अंड्यांचे सेवन केल्याने शरिराला व्हिटॅमिन्स, प्रोटीन आणि खनिजे भरपूर प्रमाणात मिळतात. खरंतर, हेल्दी राहण्यासाठी अंडी खाण्याचा सल्ला दिला जातो. पण काहीजण उन्हाळ्यात अंडी खात नाहीत.
तुम्ही दररोज व्यायाम करत असल्यास अंड्याच्या केवळ पांढऱ्या भागाचे सेवन करावे. पिवळ्या रंगातील बलक अधिक उष्ण असल्याने त्याचे सेवन करणे टाळावे.
दररोज तीन पेक्षा अधिक अंड्याचे सेवन करणे टाळले पाहिजे. उन्हाळ्याच्या दिवसात अत्याधिक अंड्यांचे सेवन केल्याने अपचन, मळमळ किंवा आतड्यांसंबंधित समस्या उद्भवू शकतात.
अंड्यामध्ये असलेले व्हिटॅमिन ए आणि डी शरिरातील हाडांना बळकटी देतात. अंडी व्हिटॅमिन बी2 चा मोठा स्रोत मानली जातात. याशिवाय अंड्यांमध्ये प्रोटीन व कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी असते.
अंड्यांच्या पांढऱ्या भागांमध्ये सेलेनियम, व्हिटॅमिन डी, बी6, बी12, लोह अशी खनिजे असतात. यामुळे शरिरातील उर्जेचा स्तर वाढणे, थकवा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढली जाते.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.