उन्हाळ्याच्या दिवसात उष्माघाताच्या समस्येत वाढ होते. यामुळे उन्हाळ्यात आरोग्याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे.
उन्हाळ्याच्या डिहाइड्रेशनची समस्या उद्भवू शकते. अशातच हाइड्रेट राहण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी प्या.
उन्हाळ्यास सिल्क किंवा अंगाला घट्ट बसणारे कपडे परिधान करणे टाळा. त्याएवजी सुती आणि सैल कपड्यांची निवड करा.
कडाक्याच्या उन्हात घराबाहेर पडणे टाळा. सकाळी लवकर अथवा संध्याकाळीच घराबाहेर पडा.
कडक उन्हात आवर्जुन सनग्लासेस लावा. यामुळे डोळ्यांचे संरक्षण होईल.
कडक उन्हात घराबाहेर पडताना चेहरा आणि डोक झाका. जेणेकरून उष्माघाताच्या समस्येपासून दूर राहण्यास मदत होईल.
उन्हाळ्याच्या दिवसात अधिक मसालेदार, तिखट आणि तेलकट पदार्थ खाण्यापासून दूर राहा.
घरात लहान मुलं आणि वृद्ध व्यक्ती असल्यास त्यांची उन्हाळ्यात खास काळजी घ्या.
शरिराला थंड ठेवण्यासाठी उन्हाळ्यात दिवसातून दोन वेळा तरी थंड पाण्याने आंघोळ करा.