सार

आपले हसणे एखाद्याला आवडण्यासाठी करण्यात आलेल्या सर्जरीचा गंभीर परिणाम हैदराबादमधील एका व्यावसायिकावर झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात व्यावसायिकाचा मृत्यू झाला आहे.

Hyderabad : तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथील एक विचित्र घटना समोर आली आहे. हैदराबाद येथील एका 28 वर्षीय व्यावसायिकाचा मृत्यू झाला आहे. या व्यावसायिकाचे लक्ष्मी नारायण असे नाव असून त्याचे काही दिवसांनी लग्न होणार होते. खरंतर, व्यावसायिकाला आपले हसणे पसंत नव्हते. त्याला आपल्या होणाऱ्या बायकोला आपले हसणे पसंत पडावे यासाठी सर्जरी करण्याचा निर्णय घेतला होता.

व्यावसायिकाने 16 फेब्रुवारीला हैदराबाद येथील जुबली हिल्स येथील एका क्लिनिकमध्ये आपल्या हसण्याची पद्धत सुधारण्यासाठी एक सर्जरी केली. सर्जरीदरम्यान, व्यावसायिकाचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या व्यावसायिकाच्या वडिलांनी म्हटले की, मुलाला कोणताही आजार नव्हता. तो ‘botched-up surgery’ सर्जरीआधी ठणठणीत होता. याशिवाय वडिलांनी असे आरोप लावले आहेत की, ऍनेस्थेसियाच्या ओव्हर डोसमुळे त्याचा मृत्यू झाला आहे.

लक्ष्मी नारायणला लोकल ऍनेस्थेसिया दिला होता
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मी नारायण याने 20 जानेवारीला डॉक्टरांना संपर्क केला होता. लग्नाआधी लक्ष्मी नारायणला आपले दात व्यवस्थितीत करून घ्यायचे होते. लक्ष्मी नारायण याने आधी खालच्या दातांची ट्रिटमेंट केली होती, जे तुटले होते. सर्जरीआधी लक्ष्मी नारायण याला लोकल ऍनेस्थेसिया (Anesthesia) दिला गेला होता. त्याला एकूण 1.1 मिलीलीटर ऍनेस्थेसियाचा डोस दिला गेला होता.

सर्जरीवेळी सुरू झाले दुखणे
दाताच्या सर्जरीदरम्यान लक्ष्मी नारायण याने दुखत असल्याचे डॉक्टरांना सांगितले. डॉक्टरांना सामान्य दुखत असल्याचे वाटल्याने त्यांनी याकडे अधिक लक्ष दिले नाही. दुखणे कमी न झाल्याने डॉक्टरांनी लक्ष्मी नारायणला संध्याकाळी एक गोळी दिली. या गोळीच्या सेवनानंतर त्याची प्रकृती बिघडली गेली.

यानंतर डॉक्टरांनी लक्ष्मी नारायण याला स्टेरॉइड इंजेक्शन देत त्याचा बीपी (Blood Pressure) तपासून पाहिला. यावेळी लक्ष्मी नारायणला CPR देखील दिला असता त्याच्या नाडीचे ठोके कमी पडत असल्याचे जाणवले. त्याचा बीपी देखील खूप कमी झाला. अशातच दवाखान्यातील कर्मचाऱ्याने रुग्णवाहिका बोलावली पण ती उशिराने आली. यानंतर रुग्णाला अपोलो रुग्णालयात दाखल केले. लक्ष्मी नारायण याचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्न केले पण त्याचा मृत्यू झाला.

आणखी वाचा : 

दाऊद इब्राहिमची संपत्ती खरेदी करणाऱ्या वकीलांनी पेमेंटसाठी मागितली वाढीव मूदत

UP : परीक्षेच्या दबावापासून दूर राहण्यासाठी विद्यार्थ्यांकडून दहशतवाद्यांद्वारे वापरल्या जाणाऱ्या गोळ्यांचे सेवन, उत्तर प्रदेशातील घटना

एकट्या टाटा समूहाने पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला टाकले मागे, रिपोर्टमधून खुलासा