एकट्या टाटा समूहाने पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला टाकले मागे, रिपोर्टमधून खुलासा

| Published : Feb 19 2024, 12:47 PM IST / Updated: Feb 19 2024, 05:55 PM IST

Tata Group

सार

टाटा समूहाचे मार्केट कॅप 365 अब्ज डॉलर्स असल्याचा खुलासा एका रिपोर्टमधून झाला आहे. आयएमएफच्या रिपोर्टनुसार पाकिस्ताचा जीडीपी 341 अब्ज डॉलर आहे.

Tata Group's market value : भारताचा शेजारील देश पाकिस्तानची स्थिती संपूर्ण जगाला माहिती आहे. अशातच आता एकट्या टाटा समूहाने संपूर्ण पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले आहे. इकोनॉमिक्स टाइम्सच्या रिपोर्ट्सनुसार, टाटा समूहाचे मार्केट कॅप 365 अब्ज डॉलर आहे. दुसऱ्या बाजूला, आयएमएफच्या (IMF) रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानचा जीडीपी 341 अब्ज डॉलर आहे. म्हणजेच, एकटा टाटा ग्रुप पाकिस्तानच्या जीडीपीपेक्षा सर्वाधिक मोठा आहे.

सोन ते सॉफ्टवेअर क्षेत्रात व्यावसाय असणाऱ्या टाटा समूहामध्ये एकापेक्षा एक उत्तम कंपन्यांचा समावेश आहे. टाटा कंसल्टेंसी सर्विसेजचे वॅल्यूएशन 15 लाख कोटी रुपये म्हणजेच 170 अब्ज डॉलर आहे. ही भारतातील दुसरी मोठी कंपनी आहे. याशिवाय पाकिस्तानची अर्धी अर्थव्यवस्था टाटा कंसल्टेंसी सर्विसेजच्या समान आहे.

गेल्या वर्षात टाटा समूहाच्या या कंपन्यांची चर्चा
गेल्या वर्षादरम्यान, टाटा मोटर्स आणि ट्रेंटच्या शेअरच्या किंमती वाढल्या गेल्याचे दिसून आले. याच कारणास्तव टाटा समूहाच्या वॅल्युएशनमध्ये वाढ झाली. गेल्या वर्षात एका दशकानंतर टाटा समूहाच्या एका कंपनीचा आयपीओ (IPO) देखील आला. या आयपीओच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना उत्तम रिटर्न्सही मिळाले. टाटा टेक्नॉलॉजीसव्यतिरिक्त टीआरएफ, ट्रेंट, बनारस हॉटेल, टाटा इन्वेस्टमेंट कॉर्पोरेशन, टाटा मोटर्स, ऑटो मोबाइल्स कॉर्पोरेशन ऑफ गोवा आणि अर्स्टन इंजिनिअरिंगच्या गुंतवणूकदारांचे पैसे एका वर्षात दुप्पट झाले.

सध्या टाटा समूहात कमीत कमी 25 कंपन्यांचा समावेश आहे. त्यापैकी टाटा केमिकल्सचे रिर्टन्स गेल्या वर्षात 5 टक्के होते. यावरुन अंदाज लावला जाऊ शकतो की, टाटा समूहातील कंपन्या शेअर मार्केटमध्चे कशा प्रकारे कामगिरी करत आहे.

या कंपन्या बाजारात लिस्टेड नाही
टाटा समूहातील काही कंपन्या बाजारात लिस्टेड नाहीत. यामध्ये टाटा सन्स, टाटा कॅपिटल, टाटा प्ले, टाटा अ‍ॅडवान्स सिस्टिम, एअर इंडिया आणि विस्ताराचा समावेश आहे. या कंपन्या शेअर मार्केटमध्ये आल्यास टाटा समूहाचे मार्केट कॅप 160 अब्ज डॉलवरवरुन 170 अब्ज डॉलरवर जाऊ शकते.

या कंपन्या लवकरच आणणार आयपीओ
टाटा कॅपिटलचा आयपीओ पुढील वर्षात लाँच होण्याची शक्यता आहे. अनलिस्टेड मार्केटमध्ये कंपनीची वॅल्यू 2.7 लाख कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय 11 लाख कोटी रुपयांचे मार्केट वॅल्यू असणारी कंपनी टाटा सन्सचा आयपीओ वर्ष 2025 मध्ये सप्टेंबर महिन्यात येऊ शकतो. टाटा प्ले कडून आधीच आयपीओसाठी सेबीकडे (SEBI) अर्ज केला आहे.

पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची स्थिती
भारताच्या तुलनेत पाकिस्तानाची अर्थव्यवस्था 11 पटींनी कमी आहे. सध्याच्या काळात देशाचा जीडीपी जवळजवळ 3.7 अब्ज डॉलर आहे. असे मानले जातेय की, भारत आर्थिक वर्ष 2028 पर्यंत जपान आणि जर्मनीला मागे टाकत तिसरी मोठी अर्थव्यवस्था होईल. सध्या भारत पाचवी सर्वाधिक मोठी अर्थव्यवस्था आहे.

दुसऱ्या बाजूला पाकिस्तान सध्या कर्जात बुडाला आहे. पाकिस्तानला 125 कोटी रुपयांचे कर्जासह त्याची परतफेड करायची आहे. याशिवाय फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह जवळजवळ 8 अब्ज डॉलरचे आहे. सरकारला यंदाच्या वर्षात आपल्या रेवेन्यूमध्ये 50 टक्के हिस्सा केवळ व्याज देण्यासाठी खर्ज करावा लागणार आहे.

आणखी वाचा : 

Modi Sarkar Campaign : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मोदी सरकारचे 24 भाषांमधील गाणे लाँच

Farmers Protest : शेतकऱ्यांचे आंदोलन दोन दिवस स्थगित, सरकारने MSP संदर्भात दिला महत्त्वाचा निर्णय

'मी अमित शाह बोलतोय...' माजी आमदाराला फोन करत निवडणुकीच्या तिकिटासाठी केली पैशांची मागणी, वाचा पुढे काय घडले