सार
उत्तर प्रदेशात फेब्रुवारी महिन्यात काही परीक्षांना सुरुवात झाली आहे. अशातच विद्यार्थी तणावाखाली आल्याने 40 तास जागे राहण्यासाठीच्या एका विशिष्ट झोपेच्या गोळ्यांचे सेवन असल्याचा प्रकार समोर आला आहे.
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशातील विद्यार्थी परीक्षेचे टेंन्शन दूर करण्यासाठी झोपेच्या गोळ्यांचे सेवन करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खरंतर या गोळ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. उत्तर प्रदेशातील विद्यार्थ्यांवर एक रिसर्च करण्यात आला. या रिपोर्टमध्ये धक्कादायक बाब समोर आली.
रिपोर्ट्समधून धक्कादायक खुलासा
उत्तर प्रदेशातील रिसर्च रिपोर्टमध्ये असा खुलासा झालाय की, परीक्षेचे टेंन्शन आणि तणाव दूर करण्यासाठी दहसतवादी सेवन करत असलेल्या गोळ्या विद्यार्थी घेत असल्यचे समोर आले आहे. जेणेकरुन विद्यार्थ्यांना झोप येणार नाही.
खरंतर परीक्षेत उत्तम गुणांनी पास होण्यासह रात्री उशिरापर्यंत जागे राहण्यासाठी विद्यार्थी झोपेच्या गोळ्यांचे सेवन करत असल्याते समोर आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.
विद्यार्थिनीला रुग्णालयात दाखल केल्याने झाला खुलासा
इयत्ता 10 वी मधील एका विद्यार्थिनीला आरोग्यासंबंधित समस्या निर्माण झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिची वैद्यकिय चाचणी केल्यानंतर कळले की, विद्यार्थिनीने झोपेच्या गोळ्यांचे सेवन केले होते.
रिपोर्टमध्ये समोर आले की, उत्तर प्रदेशातील बहुतांश विद्यार्थी रात्रभर अभ्यास करण्यासाठी मोडाफिनिल गोळ्यांचे सेवन करत आहेत. या गोळ्यांचे सेवन केल्याने 40 तास झोप येत नाही. खरंतर या गोळ्या आरोग्यासाठी धोकादायक आहेत.
26/11 हल्ल्यामधील दहशतवाद्यांकडे होत्या मोडाफिनिल टॅबलेट्स
आरोग्य तज्ज्ञ डॉ. आरके सक्सेना यांच्यानुसार, 26/11 मधील दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांकडे मोडाफिनिल टॅबलेट्स होत्या. खरंतर मार्केटमध्ये या गोळ्यांवर बंदी असून बेकायदेशीररित्या विक्री केल्या जातात.
दरम्यान, मोडाफिनिल टॅबलेट्स मार्केटमध्ये ‘चुनिया’ आणि ‘मीठी’ सारख्या कोड नावांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय विक्री केल्या जात आहेत. डॉक्टरांच्या मते, झोपेच्या गोळ्यांचे अधिक सेवन केल्याने गंभीर आजार होऊ शकतात. जसे की, मेंदूत ब्लड क्लॉटिंग, ब्रेन हॅमरेज आणि अन्यकाही गंभीर परिणाम आरोग्यावर होऊ शकतात.
आणखी वाचा :
दिल्लीतील पेंट फॅक्टरीला आग लागल्याने 11 जणांचा होरपळून मृत्यू
रवींद्र जडेजावर वडिलांनी लावलेल्या आरोपांवर क्रिकेटरची पत्नी संतप्त, दिली अशी प्रतिक्रिया