दाऊद इब्राहिमची संपत्ती खरेदी करणाऱ्या वकीलांनी पेमेंटसाठी मागितली वाढीव मूदत

| Published : Feb 19 2024, 04:08 PM IST / Updated: Feb 19 2024, 04:14 PM IST

Dawood Ibrahim

सार

आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिमची संपत्ती खरेदी करणाऱ्या दिल्लीतील वकीलांनी पेमेंटसाठी आणखी वेळ मागितला आहे. दाऊदची संपत्ती खरेदी करणाऱ्या श्रीवास्तव यांना 30 दिवसात पेमेंटचा 30 टक्के हिस्सा जमा करायचा होता. 

Dawood Ibrahim Property Bid : आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिमची महाराष्ट्रातील रत्नागिरी (Ratnagiri) येथील संपत्तीसंदर्भात एक नवे अपडेट समोर आले आहे. 5 जानेवारीला दाऊद इब्राहिम याची संपत्ती खरेदी करणारे दिल्लीतील वकील अजय श्रीवास्तव यांनी अद्याप लिलावातील बोलीचा पहिला हप्ता देखील जमा केलेला नाही.

खरंतर अजय श्रीवास्तव यांना एकूण बोलीच्या 25 टक्के हिस्सा जमा करायचा होता. श्रीवास्तव यांनी लिलावावेळी दाऊदच्या संपत्तीसाठी 2.01 कोटी रुपयांची बोली लावली होती. श्रीवास्तव यांनी त्यावेळी एका प्लॉटसाठी 3.28 लाख रुपयांचे पूर्ण पेमेंट केले होते. वकीलांनी दुसऱ्या प्लॉटचा पहिला हप्ता जमा करण्यासाठी आणखी मूदत मागितली आहे.

दाऊदच्या नावावर भूखंड
प्रशासनाने गेल्या महिन्यात दाऊदची आई अमीना बी हिचे मालकी हक्क असणाऱ्या संपत्ती जप्त करत लिलाव केला होता. यामध्ये एकूण चार भूखंडांचा समावेश होता. 171 स्क्वेअर फूटमधील सर्वाधिक लहान प्लॉटची किंमत 15 लाख 440 रुपये होती. अखेर लिलावात या प्लॉटला 2.01 कोटी रुपयांची बोली लावत खरेदी करण्यात आला.

याशिवाय 1730 स्क्वेअर फूट मीटरवर आणखी एक प्लॉट होता त्याची किंमत 1 लाख 56 हजार रुपये होती, तो 3 लाख 28 हजार रुपयांना विक्री करण्यात आला. दोन्ही प्लॉट अजय श्रीवास्तव यांनी खरेदी केले. दाऊदची अन्य संपत्ती कोणीही खरेदी केली नाही.

दरम्यान, लिलाव करण्यात आलेल्या संपत्ती खेड तालुक्यात आहेत. जेथे काही वर्ष दाऊदसह त्याच्या भावाबहिणींनी बालपण घालवले होते. दाऊदच्या या संपत्तीचा लिलाव स्मगलर्स अ‍ॅण्ड फॉरेन एक्सचेंज मॅनिपुलेटर्स अ‍ॅक्टअंतर्गत तीन पद्धतीने करण्यात आला होता.

30 दिवसांत जमा करायची होती 25 टक्के रक्कम
सूत्रांनुसार 50 लाख रुपयांपेक्षा अधिक संपत्ती खरेदी करणाऱ्यांना 30 दिवसांमध्ये 25 टक्के पेमेंट आणि 90 दिवसांमध्ये संपू्र्ण पेमेंट करायचे आहे. लिलावासाठी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांकडून सध्याच्या स्थितीचे आकलन केले जात आहे. अजय श्रीवास्तव यांनी दाऊदची संपत्ती खरेदी करताना म्हटले होते की, या संपत्तीवर सनातन धर्म पाठशाला ट्रस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल सुरू केले जाईल.

आणखी वाचा :

UP : परीक्षेच्या दबावापासून दूर राहण्यासाठी विद्यार्थ्यांकडून दहशतवाद्यांद्वारे वापरल्या जाणाऱ्या गोळ्यांचे सेवन, उत्तर प्रदेशातील घटना

एकट्या टाटा समूहाने पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला टाकले मागे, रिपोर्ट्मध्ये खुलासा

Modi Sarkar Campaign : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मोदी सरकारचे 24 भाषांमधील गाणे लाँच