11:26 PM (IST) Jul 20

Cockroach Janata Party Live Updates Missile Attack - युक्रेनच्या समुद्रात मिसाईल अटॅक, ४ भारतीय कर्मचाऱ्यांचा मृत्यू

Ukraine Odesa Port MV Golden Ship Missile Attack : समुद्रातून धान्य घेऊन जाणाऱ्या जहाजावर मिसाईल हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात चार भारतीय कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर एक भारतीय गंभीर जखमी आहे. परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.

Read Full Story
10:01 PM (IST) Jul 20

Cockroach Janata Party Live Updates JP Nadda - आंदोलकांनी आंदोलन थांबवावं, प्रशासनाला मदत करावी; CJP भेटीनंतर जे.पी नड्डा यांचं आवाहन

CJP Protest JP Nadda Meeting : केंद्रीय मंत्री जे.पी नड्डा यांनी आंदोलनकांनी आंदोलन थांबवावं असं आवाहन केलं आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या भेटीनंतर त्यांनी हे आवाहन केलं आहे.

Read Full Story
09:20 PM (IST) Jul 20

Cockroach Janata Party Live Updates Sonam Wangchuk - अन्नत्याग उपोषण सुरूच राहणार, सोनम वांगचुक यांचा मोठा निर्णय; कारणही सांगितलं

Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक यांनी त्यांचं अन्नत्याग उपोषण सुरूच राहणार असल्याचं सांगितलं आहे. आंदोलकांवरील लाठीचार्जनंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

Read Full Story
07:33 PM (IST) Jul 20

Cockroach Janata Party Live Updates Sonam Wangchuk - सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे, जे.पी. नड्डांसोबतच्या मिटिंगनंतर २३ दिवसांनी अन्नत्याग उपोषण सोडलं

Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक यांनी तब्बल २३ दिवसांनी अन्नत्याग उपोषण मागे घेतलं आहे. जे.पी. नड्डा यांनी कॉकरोच जनता पार्टीच्या प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेनंतर हे उपोषण सोडलं आहे.

Read Full Story
05:24 PM (IST) Jul 20

Cockroach Janata Party Live Updates Dharmendra Pradhan - धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार? कॉकरोच पार्टीच्या आंदोलनादरम्यान शिक्षण मंत्री अमित शहांच्या भेटीला

Dharmendra Pradhan Meeting with Amit Shah : संसदेवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान गृहमंत्री अमित शहांच्या भेटीला पोहोचले. त्यानंतर आता ते राजीनामा देणार का? याबाबत एकच चर्चा आहे.

Read Full Story
04:47 PM (IST) Jul 20

Cockroach Janata Party Live Updates Car Prices - १ जुलैपासून तुमच्या छोट्या गाड्या महागणार? जाणून घ्या GST चा परिणाम

१ जुलैपासून लागू होणाऱ्या GST मुळे केंद्र आणि राज्यांचे मिळून किमान १० वेगवेगळे टॅक्स एकाच करात विलीन होतील.

Read Full Story
03:14 PM (IST) Jul 20

Cockroach Janata Party Live Updates कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाचे महाराष्ट्रात पडसाद

कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाचे महाराष्ट्रात पडसाद उमटले आहेत. पुणे, नाशिकमध्ये आंदोलन केले जात आहे. 

02:36 PM (IST) Jul 20

Cockroach Janata Party Live Updates कॉक्ररोच जनता पार्टीचे शिष्टमंडळ आणि जेपी नड्डा यांच्यामध्ये 10 मिनिटे चर्चा

कॉक्ररोच जनता पार्टीचे शिष्टमंडळ आणि जेपी नड्डा यांच्यामध्ये 10 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. आमच्या मागण्यांच पत्र जेपी नड्डा यांच्याकडे सोपवण्यात आल्याचे सीजेपीने म्हटले आहे. 

02:19 PM (IST) Jul 20

Cockroach Janata Party Live Updates मोर्चा संसदेच्या दीडशे मीटर अंतरावर पोहोचला

मोर्चा संसदेच्या दीडशे मीटर अंतरावर पोहोचला आहे. सध्या संसद भवन परिसरात गदारोळाची स्थिती निर्माण झाली आहे. 

01:28 PM (IST) Jul 20

Cockroach Janata Party Live Updates आंदोलकांवर पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा

आंदोलकांवर पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा करण्यात आला आहे. तसेच दिल्ली संसद भवन परिसरात सुरक्षितता वाढवली. खबरदारी म्हणून पोलिसांकडून मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे. 

12:25 PM (IST) Jul 20

Cockroach Janata Party Live Updates जेपी नड्डा यांची भेट घेणार CJP चे प्रतिनिधी

कॉक्रोच जनता पार्टीचे प्रतिनिधी लवकरच केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांची भेट घेणार आहेत. पार्टीचे प्रवक्ते सौरव दास यांनी म्हटले की, सरकारने त्यांच्यासोबत बाचतीत करण्यासाठी स्वत:हून संपर्क साधला आहे.

11:35 AM (IST) Jul 20

Cockroach Janata Party Live Updates जंतर-मंतरवर पोहोचले आतिशी आणि मनीष सिसोदिया

जंतर-मंतरवर सुरू असणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला आम आदमी पक्षाच्या काही नेत्यांकडून पाठिंबा देण्यात आला आहे. जंतर-मंतरवर बॅरिकेड्स लावले असले तरीही आतिशी आणि मनीष सिसोदिया यांच्यासह संजय सिंह कूदकर आंदोलनकर्त्यांना समर्थन देण्यासाठी पोहोचले आहेत.

11:09 AM (IST) Jul 20

Cockroach Janata Party Live Updates जंतर-मंतरवर पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज

जंतर-मंतरवर पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आल आहे. पोलिसांच्या कारवाईमुळे आंदोलक संतप्त झाले आहेत. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू करण्यात आले आहे. दिल्ली-संसद परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

11:06 AM (IST) Jul 20

Cockroach Janata Party Live Updates सौरव दास उपायुक्तांच्या कार्यालयात

CJP चे मुख्य प्रवक्ते सौरभ दास यांना उपआयुक्तांच्या कार्यालयात नेण्यात आले आहे. सौरभ दासने म्हटले की, "आमची सरकारसोबत चर्चा सुरू आहे."

Scroll to load tweet…

10:57 AM (IST) Jul 20

Cockroach Janata Party Live Updates "सरकार लोकशाहीवादी असतं तर CJP च्या मोर्चाला परवानगी नाकारली नसती"; संजय राऊतांचा हल्लाबोल

दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर UBT चे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाष्य केले. याशिवाय सरकारवर हल्लाबोलही केला.

Read Full Story
10:46 AM (IST) Jul 20

Cockroach Janata Party Live Updates कॉक्रोच जनता पार्टीचा आज संसदेवर मोर्चा, जंतर-मंतरवर पोलीस बंदोबस्तात वाढ

संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजधानी दिल्लीत आंदोलनाचे वातावरण तापले आहे. कॉक्रोच जनता पार्टीकडून आज पोलिसांच्या परवानगीशिवाय मोर्चा काढला जाणार आहे.

Read Full Story