ZOOM मीटिंगमध्ये हिंदी भाषेत चर्चा केल्याने कर्मचाऱ्यांत वादावादी, VIDEO होतोय तुफान VIRAL

| Published : Jan 01 2024, 05:51 PM IST / Updated: Jan 01 2024, 06:01 PM IST

Zoom Call meeting

सार

Zoom Meeting Viral Video : झूम मीटिंगदरम्यान कर्मचाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नेमके काय आहे हे प्रकरण?

Zoom Meeting Argument Over Hindi Speaking : झूम कॉल मीटिंगदरम्यान कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ऑनलाइन मीटिंगमध्ये एक कर्मचारी हिंदी भाषेत संवाद साधत होता. भाषा समजत नसल्याने अन्य कर्मचारी त्याला इंग्रजी भाषेत संभाषण करण्यास सांगत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. पण पुढे याच विषयावरून त्यांच्यात वाद रंगला. 

‘घर के कलेश’ नावाच्या सोशल मीडिया हँडलवर ही व्हिडीओ क्लिप शेअर करण्यात आली आहे. मीटिंगमध्ये सर्वजण नवीन वर्षातील योजनांबाबत चर्चा करत असल्याचं दिसत आहे.

…अन् कर्मचारी भडकले

एका कंपनीचे काही कर्मचारी झूम कॉल मीटिंगमध्ये चर्चा करत असल्याचे व्हिडीओ क्लिपमध्ये दिसत आहेत. यामध्ये एकाने आपल्या सहकाऱ्याला इंग्रजी भाषेमध्ये संवाद साधण्याची विनंती केली. विनंतीनुसार त्या कर्मचाऱ्याने इंग्रजी भाषेमध्ये स्वतःचे काही मुद्दे मांडल्यानंतर तो पुन्हा हिंदी भाषेमध्ये बोलू लागला. 

ज्यामुळे काही सहकारी त्याच्यावर भडकले आणि आपापल्या भाषेमध्ये आक्षेप नोंदवू लागले. कर्मचाऱ्यांमध्ये रंगलेल्या या वादाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. एकीकडे सर्वांचे वाद सुरू असताना यापैकी एक जण आपल्या सहकाऱ्याला समजून घेण्याची विनंती करत परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत असल्याचंही दिसले. पण वाद थांबला नाही.

वादाच्या व्हिडीओची तारीख अस्पष्ट

कर्मचाऱ्यांमधील वादाचा हा व्हिडीओ नेमक्या कोणत्या तारखेचा आहे, याबाबत अचूक माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर युजर्स या विषयावर आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

'Ghar Ke Kalesh' नावाच्या पेजद्वारे शनिवारी (30 डिसेंबर 2023) हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला 10 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हिंदी भाषेमध्ये संभाषण करण्याच्या मुद्यावर नेटकरी देखील वेगवेगळी मते मांडत आहेत. एकूणच झूम मीटिंगमधील वादाच्या विषयावर आता सोशल मीडियावरील युजर्समध्येही शाब्दिक युद्ध सुरू झाल्याचे दिसत आहे.

आणखी वाचा : 

ITR फायलिंग ते सिमकार्ड खरेदी, या 7 गोष्टींमध्ये आजपासून मोठे बदल

PhD Vegetable Seller : 11 वर्षे विद्यापीठात प्राध्यापक म्हणून केले काम, आता घरोघरी विकताहेत भाजीपाला

ISRO XPoSat Satellite : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ISROला मोठे यश, XPoSat उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

धक्कादायक! महिलेला प्रेग्नेंट करा व 13 लाख रूपयांचे बक्षीस मिळवा, लोकांना गंडा घालणारी टोळी गजाआड