Nandan Nilekani Warns AI Could Eliminate 90 Million Jobs : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मुळे जगभरात ९ कोटी नोकऱ्या धोक्यात येतील, पण त्याचवेळी १७ कोटी नव्या संधीही निर्माण होतील, असा इशारा इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन निलेकणी यांनी दिला आहे.

Nandan Nilekani Warns AI Could Eliminate 90 Million Jobs : इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन निलेकणी यांनी एक मोठा इशारा दिला आहे. त्यांच्या मते, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मुळे जगभरात तब्बल ९ कोटी नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात. पण, दिलासादायक बाब म्हणजे AI मुळेच १७ कोटी नवीन नोकऱ्या निर्माणही होतील. या बदलांचा भारतावरही मोठा परिणाम होणार आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

बंगळुरूमध्ये झालेल्या 'इन्फोसिस एआय इन्व्हेस्टर डे-२०२६' या कार्यक्रमात ते बोलत होते. निलेकणी म्हणाले, 'याआधीही टेक्नॉलॉजीमुळे मोठे बदल झाले आहेत, पण AI मुळे होणारा बदल हा आतापर्यंतच्या सर्व बदलांपेक्षा खूप मोठा असेल. AI ची ही नवीन लाट टॅलेंट आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये मोठी क्रांती घडवेल. यामुळे भारतात मोठ्या संख्येने काम करणाऱ्या अनेक टेक्निशियन्सच्या नोकऱ्या जाऊ शकतात. सध्या ९ कोटींपेक्षा जास्त नोकऱ्यांवर धोका आहे.'

नव्या संधींची निर्मिती:

निलेकणी यांनी स्पष्ट केलं की, 'फ्रंट-एंड डेव्हलपर्स, क्वालिटी ए टेस्टर्स, आयटी सपोर्ट स्पेशालिस्ट आणि ब्लॉकचेन डेव्हलपर्स यांसारखी विशिष्ट कामं करणारे इंजिनिअर्स भविष्यात कालबाह्य ठरतील. पण त्याचवेळी, AI मुळे 'एआय फॉरेन्सिक ॲनालिस्ट', 'एआय लीड्स' आणि 'एआय इंजिनिअर्स' यांसारख्या तब्बल १७ कोटी नवीन नोकऱ्यांची संधी निर्माण होईल.'

कोणत्या क्षेत्रातील नोकऱ्यांना धोका?

- फ्रंट-एंड डेव्हलपर्स

- क्वालिटी ए टेस्टर्स

- आयटी सपोर्ट स्पेशालिस्ट

- ब्लॉकचेन डेव्हलपर्स