'इंदिरा-राजीव गांधी यांच्या वारशाचा अनादर..', आनंद शर्मा यांनी मल्लिकार्जुन खरगेंना पत्र लिहित म्हटले...

| Published : Mar 21 2024, 03:45 PM IST / Updated: Mar 21 2024, 04:01 PM IST

Congress Anand Sharma

सार

लोकसभा निवडणुकीआधी जातीनिहाय जनगणनेसंदर्भात काँग्रेसची खदखद समोर आली आहे. अशातच काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना एक पत्र लिहिले आहे.

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीआधी जातीनिहाय जनगणेनेसंदर्भात काँग्रेसची (Congress) खदखद समोर आली आहे. काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य आणि पक्षाचे वरिष्ठ नेते आनंद शर्मा (Anand Sharma) यांनी माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या जातीनिहाय जनगणेसंदर्भातील (Caste Census) विधानावर निशाणा साधला आहे.

काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांना पत्र लिहून म्हटले की, जातीनिहाय जनगणना रामबाण उपाय नाहीच पण यामुळे बेरोजगारीही दूर होऊ शकते नाही. याशिवाय पत्रात आनंद शर्मांनी म्हटले की, जातीनिहाय जनगणना करणे म्हणजे इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या वारशाचा अनादर करण्यासारखे आहे.

आनंद शर्मांनी पत्रात काय म्हटलेय?
आनंद शर्मा यांनी काँग्रेसच्या दृष्टीकोनाच्या आधारावर इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या लोकप्रिय घोषणांचा संदर्भ देत म्हटले की, सध्याचा काँग्रेस पक्ष आधीच्या काँग्रेस सरकारच्या विचारसणी फार वेगळी असल्याचे वाटते. याच कारणास्वत पक्षातील राजकीय विरोधकांना चिखलफेक करण्याची संधी मिळणार आहे. आनंद शर्मा यांनी इंदिरा गांधीच्या वर्ष 1980 मधील घोषणेची आठवण काढली. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Former PM Indira Gandhi) यांनी म्हटले होते की, ‘ना जात पर ना पात पर, मुहर लगेगी हाथ पर.’

याशिवाय पत्रात आनंद शर्मा यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या (Former PM Rajiv Gandhi) त्या विधानाचाही उल्लेख केलाय ज्यामध्ये त्यांनी म्हटले होते की, "जर संसदेच्या आणि विधानसभेच्या क्षेत्रात जातीवादाचा मुद्दा निर्माण झाल्यास आपल्याला समस्यांचा सामना करावा लागेल. काँग्रेस या देशाला विभाजित होताना पाहू शकत नाही."

राहुल गांधी यांनी काय म्हटले?
राहुल गांधी यांनी रॅली आणि भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा अनेकदा उचलून धरल्याचे दिसून आले आहे. राहुल गांधी यांच्यानुसार जातीनिहाय जनगणना देशाचा एक्सरे असून सर्वकाही सत्य समोर येईल. राहुल गांधी यांनी अलाहाबादमधील तरुणांना संबोधित करत म्हटले होते की, जातीनिहाय जनगणना तरुणांचे शस्र आहे.

काँग्रेसमधील वाद
एका बाजूला काँग्रेस 2024 च्या लोकसभा निवडणुकीत जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा उचलून धरण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसऱ्या बाजूला आनंद शर्मा यांनी काँग्रेसवर जातीनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर टीका केली आहे. अशातच कांग्रेस अंतर्गत कलह सुरू असल्याचे स्पष्ट होतेय. याआधी आनंद शर्मा यांनी वर्ष 2021 मध्ये देखील काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना एक पत्र लिहित मागणी केली होती की, पक्षाच्या कामकाज प्रणालीत बदल करावा.

आणखी वाचा : 

Lok Sabha Election 2024 : 'काँग्रेसने पराभवाच्या भीतीपोटी इन्कम टॅक्स कार्यवाही विरोधात बोलावली पत्रकार परिषद', जेपी नड्डा यांनी केला हल्लाबोल

Lok Sabha Election 2024 : अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय नागरिकांना लोकसभा निवडणुकीत मतदान करता येणार? जाणून घ्या नियम

Loksabha Election : निवडणूक प्रचारात कोणत्या चुका पक्ष आणि उमेदवारांना महागात पडू शकतात? आचारसंहितेचे नियम जाणून घ्या

Read more Articles on