सार
भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी काँग्रेसने घेतलेल्या पत्रकार परिषदेवर जोरदार टीका केली आहे. जेपी नड्डा यांनी म्हटले की, कांग्रेसने भीतीपोटी भारतातील लोकशाही आणि संस्थांच्या विरोधात विधाने केली आहेत.
JP Nadda on Congress : इन्कम टॅक विभागाकडून (Income Tax Department) काँग्रेसची (Congress) बँक खाती गोठवली आहेत. याच प्रकरणासंबंधित गुरुवारी (21 मार्च) काँग्रेसने पत्रकार परिषद बोलावली होती. या पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या सोनिया गांधी (Sonia Gandhi), काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी उपस्थिती लावली होती.
इन्कम टॅक्सच्या कार्यवाही विरोधात काँग्रेसचा हल्लाबोल
इन्कम टॅक्सने काँग्रेसच्या विरोधात केलेल्या कार्यवाहीवर पक्षाने पत्रकार परिषद बोलावून टीका केली. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसच्या विरोधात फौजदारी कारवाया करत असल्याचे म्हटले. दरम्यान, काँग्रेसच्या पत्रकार परिषदेवर भाजपचे (BJP) अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
जेपी नड्डा यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
जेपी नड्डा यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. जेपी नड्डा यांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'X' वर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये जेपी नड्डा यांनी म्हटले की, “काँग्रेसला संपूर्ण जनता पूर्णपणे नाकारणार आहे. याशिवाय ऐतिहासिक भीतीपोटीच काँग्रेसने आज पत्रकार परिषद बोलावली होती. याशिवाय काँग्रेसने घाबरून भारतीय लोकशाही आणि संस्थांच्या विरोधात विधाने केली आहेत. काँग्रेस आपल्या चुकांसाठी आर्थिक समस्यांचे कारण देत त्या झाकण्याचा प्रयत्न करत आहेत. खरंतर, काँग्रेसची दिवाळखोरी आर्थिक नसून नैतिक आणि बौद्धिक आहे. आपल्या चुका सुधारण्याएवजी काँग्रेस आपल्याच समस्यांसाठी अधिकाऱ्यांना दोषी ठरवत आहेत. आयकर अपील न्यायाधिकरण (Income Tax Appellate Tribunal) असो किंवा दिल्ली उच्च न्यायालयाने काँग्रेसला नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे. यासोबत काँग्रेसला थकबाकी टॅक्सचे पेमेंटही करण्यास सांगितले असून त्यांनी अद्याप ते केलेले नाही.”
आणखी वाचा :
विकसित भारत मेसेजसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा दणका, WhatsApp ला मेसेज न पाठवण्याचे दिले आदेश