MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • India
  • नंबर केला ब्लॉक, चॅटिंग-कॉलिंग बंद, प्रेयसीने घरी जाऊन प्रियकराच्या छातीत भोसकला चाकू!

नंबर केला ब्लॉक, चॅटिंग-कॉलिंग बंद, प्रेयसीने घरी जाऊन प्रियकराच्या छातीत भोसकला चाकू!

Woman Stabs Boyfriend to Death for Blocking Her Number : छत्तीसगडच्या बिलासपूरमध्ये फोन नंबर ब्लॉक केल्यामुळे २२ वर्षीय तरुणीने प्रियकराच्या घरी जाऊन त्याची चाकूने भोसकून हत्या केली. २५ वर्षीय कामता प्रसाद सूर्यवंशी याचा मृत्यू झाला.

1 Min read
Author : Asianetnews Team Marathi | AFP
Published : Feb 04 2026, 09:31 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
13
असे पडले प्रेमात
Image Credit : Asianet News

असे पडले प्रेमात

छत्तीसगडमधील बिलासपूरमध्ये मोबाईल फोन ब्लॉक केल्याच्या वादातून एका तरुणीने प्रियकराची हत्या केली. २५ वर्षीय कामता प्रसाद सूर्यवंशी असे मृत प्रियकराचे नाव आहे. तर २२ वर्षीय रोशनी असे आरोपी तरुणीचे नाव आहे. हॉटेल कर्मचारी असलेला सूर्यवंशी आणि रोशनी यांची सहा महिन्यांपूर्वी इंस्टाग्रामवरून ओळख झाली आणि त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांपासून कामताने रोशनीसोबत बोलणे आणि मेसेज करणे बंद केले होते व तिचा नंबर ब्लॉक केला होता.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
23
रक्ताच्या थारोळ्यात पडला
Image Credit : X

रक्ताच्या थारोळ्यात पडला

प्रियकर दुसऱ्या मुलीला भेटू लागल्याच्या संशयावरून संतापलेली रोशनी चाकू घेऊन त्याच्या घरी पोहोचली. त्यानंतर झालेल्या वादात तिने सोबत आणलेल्या चाकूने त्याच्यावर वार केले. कामतासोबत राहणाऱ्या व्यक्तीने आरडाओरडा ऐकून धाव घेतली, तेव्हा तो रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेला दिसला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्याचा मृत्यू झाला. तरुणीला अटक करण्यात आली असून तिच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस अधिकारी सुम्मत साहू यांनी दिली.

Related Articles

Related image1
डेली वेअरसाठी खास चांदीचे पैंजण, पाहा लेटेस्ट डिझाइन्स
Related image2
फक्त 0.5gm सोन्यात खुलेल सौंदर्य, पाहा या 6 फ्लॉवर डिझाइन इअररिंग्स
33
छातीत चाकू भोसकला
Image Credit : X

छातीत चाकू भोसकला

तरुणी चाकू घेऊन खोलीत आली आणि तिने त्याचा फोन मागितला. वादावादीत तिने त्याच्या छातीत चाकू भोसकला, असे पोलिसांनी सांगितले. मृत तरुण भाजप नेते आणि जिल्हा पंचायत अध्यक्ष राजेश सूर्यवंशी यांचा पुतण्या असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. प्रियकराला फक्त घाबरवण्यासाठी चाकू आणला होता आणि रागाच्या भरात हे कृत्य घडले, असे तरुणीने पोलिसांना सांगितले.

India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.

About the Author

AT
Asianetnews Team Marathi
भारताचे बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Amazon Flipkart Sale: ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर बंपर ऑफर, स्वस्तात मिळतायत बाईक आणि स्कूटर
Recommended image2
Ambedkar Statue Vandalised: आग्रा: आंबेडकरांच्या पुतळ्याची तोडफोड, भीम आर्मी आक्रमक
Recommended image3
Wildlife Decline: जगभरात वन्यजीवांची संख्या घटतेय, पण काही प्रजातींना वाचवण्यात यश
Recommended image4
Viral Video: पुरुषांच्या वॉशरूममध्ये सॅनिटरी पॅड मशीन! व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले, 'ही तर जेंडर इक्वॅलिटी'
Related Stories
Recommended image1
डेली वेअरसाठी खास चांदीचे पैंजण, पाहा लेटेस्ट डिझाइन्स
Recommended image2
फक्त 0.5gm सोन्यात खुलेल सौंदर्य, पाहा या 6 फ्लॉवर डिझाइन इअररिंग्स
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved