- Home
- Entertainment
- मोदी सरकारनं नोटबंदी केल्यामुळं कर्ज परत दोषी करू शकलो नाही, उद्योगपती राज कुंद्राने सरकारवरला धरलं दोषी
मोदी सरकारनं नोटबंदी केल्यामुळं कर्ज परत दोषी करू शकलो नाही, उद्योगपती राज कुंद्राने सरकारवरला धरलं दोषी
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्यावर ६० कोटींच्या आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असून राज कुंद्राने नोटाबंदीमुळे व्यवसायात नुकसान झाल्याचा दावा केला आहे

मोदी सरकारनं नोटबंदी केल्यामुळं कर्ज परत करू शकलो नाही, उद्योगपती राज कुंद्राने सरकारवरला धरलं दोषी
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा नवरा राज कुंद्रा यांच्या अडचणींमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. अभिनेत्री आणि तिच्या नवऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौकशीसाठी पोलिसांनी घरी मारल्या चकरा
चौकशीसाठी पोलिसांनी घरी चकरा मारल्या असून शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राचा जबाब घेतला आहे. त्यानं पोलिसांना सांगितलं की, सरकारने केलेल्या नोटाबंदीमुळे त्यांच्या बिझनेसचे मोठे नुकसान झालेले आहे.
६० कोटींच्या आर्थिक फसवणुकीची चौकशी सुरु
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा या दोघांची ६० कोटींच्या आर्थिक फसवणुकीची चौकशी सुरु करण्यात आली आहे. त्यांच्या घरी पोलिसांच्या चकरा होत असून त्यांच्यावर विविध आरोप करण्यात आले आहेत.
नोटबंदीमुळे माझे मोठे नुकसान झाले
उद्योगपती राज कुंद्रा म्हणतो की त्यांची इलेक्ट्रिकल आणि गृहोपयोगी उपकरणांसंबंधी त्यांची कंपनी होतीपरंतु नोटाबंदीनंतर कंपनीला मोठा आर्थिक फटका बसला. कुंद्रा पुढं बोलताना म्हणाले की, आर्थिक संकटामुळे कंपनी कर्ज घेतलेली रक्कम पार्ट करू शकली नाही.
शिल्पाची करण्यात आली चौकशी
शिल्पा शेट्टीची बराच वेळ चौकशी करण्यात आली. तिची साडेचार तास चौकशी केल्यानंतर राज कुंद्राचा दुसऱ्यांदा जबाब नोंदवण्यात आला. अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, चौकशीच्या संदर्भात कुंद्रा यांना समन्स बजावण्यात येणार आहे.
परदेश प्रवासावर घालण्यात आली बंदी
मुंबई उच्च न्यायालयाने शिल्पा आणि राज यांची परदेश प्रवासाची याचिका फेटाळून लावली होती. न्यायालयाने आदेश दिला होता की जर त्यांना लॉस एंजेलिस, यूएसए किंवा इतर कोणत्या परदेशात जायचे असेल तर त्यांनी प्रथम 60 कोटी जमा करावे लागतील.

