शाहरुख वाढदिवसाच्या दिवशी मन्नत बाहेर का नाही आला, कारण ऐकून मनात येईल चीड
शाहरुख खानने त्याच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त 'मन्नत' बंगल्याबाहेर चाहत्यांना भेटण्याचा कार्यक्रम रद्द केला. गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव टीमने दिलेल्या सल्ल्यानुसार हा निर्णय घेतल्याचे सांगत चाहत्यांची माफी मागितली

शाहरुख वाढदिवसाच्या दिवशी मन्नत बाहेर का नाही आला, कारण ऐकून मनात येईल चीड
शाहरुख खान काल ६० वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या वाढदिवसाला चाहते मन्नत बंगल्याच्या बाहेर येऊन तो कधी बाहेर येईल याची वाट पाहत असतात. त्याने त्याच्या घराबाहेर येण्याची भेट रद्द केली.
आज चाहत्यांशी होणारी भेट झाली रद्द
आज शाहरुख खान त्याच्या मन्नत बंगल्याच्या बाहेर येऊन चाहत्यांना अभिवादन करणार नाही. त्याने यावेळी कारण दिलं असून चाहत्यांची याबद्दल माफी मागितली आहे. आपण त्याच्याकडून कारण जाणून घेऊयात.
शाहरुख खान काय म्हणाला?
शाहरुख खानने यावेळी बोलताना मत व्यक्त केलं आहे. त्यानं म्हटलं आहे की, 'मी बाहेर येऊन माझी वाट पाहणाऱ्या माझ्या चाहत्यांना भेटू शकणार नाही. मी तुम्हा सर्वांची मनापासून माफी मागतो. बाहेर असलेली गर्दी नियंत्रणाच्या बाहेर गेल्यामुळे आणि सर्वांच्या सुरक्षिततेसाठी हे आवश्यक आहे, त्यामुळे माझ्या टीमने मला बाहेर न येण्याचा सल्ला दिला आहे.'
मी तुमच्या प्रेमासाठी उत्सुक आहे
अभिनेत्यानं यावेळी चाहत्यांना तो का भेटला नाही याच कारण सांगितलं आहे. तो पुढं म्हणतो की, 'तुमच्या समजुतीबद्दल धन्यवाद, आणि माझ्यावर विश्वास ठेवा...तुमच्यापेक्षा तुम्हाला भेटण्यासाठी मी जास्त उत्सुक आहे. मी तुम्हा सर्वांना भेटण्यासाठी आणि तुमच्या प्रेमासाठी खूप उत्सुक आहे. Love u all…'
अलिबागच्या फार्महाऊसवर केला वाढदिवस साजरा
अलिबागच्या फार्महाऊसवर यावेळी शाहरुख खानने वाढदिवस साजरा केला आहे. त्याच्या कुटुंबासह आणि जवळच्या मित्रांसोबत त्यानं सेलिब्रेशन केल्याचं सांगण्यात आलं आहे.
चाहते शाहरुख खानची एक झलक पाहण्यासाठी वेडे
चाहते शाहरुख खानची एक झलक पाहण्यासाठी वेडे आहेत. ते मन्नत बाहेर आपला आवडता अभिनेता कधी येईल याची वाट पाहत असतात. यावर्षी मात्र चाहत्यांचा हिरमोड झाल्याचं दिसून आलं.

