Bigg Boss Marathi 6: रोशन भजनकर एलिमिनेट?

Share this Video

Bigg Boss Marathi 6 मध्ये सातव्या आठवड्यात प्रेक्षकांना जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. सोशल मीडियावर व्हायरल चर्चेनुसार, रोशन भजनकर याचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपल्याचं सांगितलं जात आहे. साधेपणा आणि शांत गेम असूनही, रोशनचा गेम अपेक्षेइतका प्रभावी ठरला नाही, असं नेटकऱ्यांचं मत आहे.दरम्यान, कलर्स मराठीने शेअर केलेल्या नव्या प्रोमोमध्ये रितेश देशमुख नॉमिनेटेड स्पर्धकांना “एलिमिनेशन उद्या नाही, आजच होणार” असं सांगतो. प्रोमोमध्ये अनेक स्पर्धकांनी रोशनचंच नाव घेतल्याचंही दिसून येत आहे.याच दरम्यान घरात दुसऱ्यांदा वाइल्ड कार्ड एंट्री होत असून, यावेळी एक नाही तर थेट 3 नवे सदस्य घरात दाखल होणार आहेत. “ट्रिपल एंट्री, ट्रिपल मनोरंजन, ट्रिपल ट्रबल” असं कॅप्शन असलेला भाऊच्या धक्क्याचा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे.

Related Video