हिना खानने सलमान खानचे मानले आभार, कारण ऐकून म्हणाल वाह भाईजान मानलं तुम्हाला!
बिग बॉसच्या घरात तान्या मित्तल आणि नीलम गिरी यांनी अशनूर कौरला तिच्या वाढत्या वजनावरून 'हत्ती' आणि 'डायनोसॉर' म्हणून चिडवले. या घटनेनंतर, विकेंड का वारमध्ये सलमान खानने त्या दोघींना खडे बोल सुनावले.

हिना खानने सलमान खानचे मानले आभार, कारण ऐकून म्हणाल वाह भाईजान तुम्हाला मानलं!
बिग बॉस मध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही. एका भागामध्ये तान्या मित्तल आणि नीलम गिरी यांनी अशनूर कौरची शरीराबद्दल वाईट कमेंट केली होती. वाढत्या वजनावरून त्यांनी तिला सुनावलं होतं.
तान्या व नीलम काय म्हणाल्या?
तान्या व नीलम यांनी बोलताना अशनूरला हत्ती आणि डायनोसॉर म्हटलं होतं. त्यानंतर अनेकांनी अशनुरच्या समर्थनार्थ पोस्ट केल्या होत्या. त्या दोघींवर यावरून मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली.
सलमान खानने प्रतिक्रिया द्यावी
यावर सलमान खान याने प्रतिक्रिया द्यायला हवी असं सांगण्यात आलं. विकेंड का वार यामध्ये सलमानने दोघींना कडक शब्दांमध्ये सुनावलं होतं. हिना खान हिने आता अशनूर साठी पोस्ट लिहिली आहे.
हिना खान पोस्टमध्ये काय म्हणते?
यावेळी बोलताना हिना खान हिने आपलं मत व्यक्त केलं आहे. ती बोलताना म्हणते की, मी या आठवड्याच्या विकेंड का वारची वाट बघत होते. म्हणूनच मी अशनूरवर करण्यात आलेल्या टीकेचा राग व्यक्त केला नव्हता. मला माहिती होत की सलमान खान यावर बोलेल.
सलमानचे का मानले आभार?
यावेळी हिना खान हिने सलमान खानचे आभार मानले आहेत. धन्यवाद सलमान, हा विषय इतक्या सहजतेने आणि संयमाने हाताळल्याबद्दल तुझं मनःपूर्वक आभार.
हिना अशनूरबद्दल बोलताना काय म्हणते?
यावेळी हिनाने अशनूर बद्दलचे मत व्यक्त केलं आहे. ती बोलताना म्हणते की एका मुलीच्या वजन, उंची यावरून तिचे स्पर्धक तिला चिडवत आहेत. त्या वय आणि अनुभवाने मोठ्या असूनही असं करत आहेत तर हे लाजिरवाणे आहे.

