उर्मिला कोठारेच्या गाडीने दोन मजूरांना चिरडले, एकाचा मृत्यू तर एक जखमी (Video)

| Published : Dec 28 2024, 05:34 PM IST / Updated: Dec 28 2024, 05:35 PM IST

Urmila Kotahre Car Accident
उर्मिला कोठारेच्या गाडीने दोन मजूरांना चिरडले, एकाचा मृत्यू तर एक जखमी (Video)
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

मराठमोळी अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या गाडीचा अपघात घडल्याची बातमी समोर आली आहे. कांदिवली येथे गाडीचा अपघात झाला असून यामध्ये दोन मजुर चिरडले गेलेत. नक्की काय घडले जाणून घेऊया सविस्तर...

Urmila Kothare Car Accident : मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारचा मुंबईतील कांदिवली येथे अपघात झाला. या अपघातात दोन मजूरांना चिरडल्याचे वृत्त आहे. यामधील एकाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर रुपात जखमी झाला आहे. जखमी मजूरावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याशिवाय अभिनेत्रीसह कार चालकालाही दुखापत झाली आहे.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

कारच्या अपघातानंतर सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसतेय की, कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे. यावरुनच कळते की, अपघात किती भीषण होता.दरम्यान, घटना शुक्रवारी रात्री घडल्याचे सांगितले जात आहे. रात्रीच्या वेळेस उर्मिला शूटिंगवरुन घरी येत होती. त्यावेळीच कार अनियंत्रित झाल्याने पोइसर मेट्रो स्थानकाजवळ काम करत असलेल्या मजूरांना धडकली. यामध्ये दोन मजूरांपैकी एकाचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.

 

 

अपघातानंतर पोलिसांकडून तपास सुरू

कार अपघातानंतर पोलिसांकडून सध्या तपास केला जात आहे. या प्रकरणावर अद्याप उर्मिला कोठारेकडून कोणतेही अधिकृत विधान करण्यात आलेले नाही. सदर प्रकरणाचा संपूर्ण तपास केल्यानंतरच समोर येईल की, कार दुर्घटनेमागे नेमके कारण काय होते. याशिवाय अभिनेत्रीवर कारवाई करावी की नाही.

आणखी वाचा : 

Salman Khan कडे आहेत महागड्या वस्तू, किंमत ऐकून व्हाल हैराण

पाकिस्तानात Netflix वर सर्वाधिक पाहिलेले १० चित्रपट