सलमान खानचे मुंबईत वांद्रे येथे आलिशान घर आहे. याची किंमत 100 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.
सलमान खानचे पनवेल येथे सुंदर असे फार्महाउस आहे. या फार्महाउसची किंमत 80 कोटी रुपये असून 150 एकर जमिनीवर उभारलेले आहे.
महाराष्ट्रातील गोराई बीचवर सलमानचे सुंदर असे बीच हाउस आहे. यामध्ये जिम, थिएटर आणि स्विमिंग पूल देखील आहे. याची किंमत 100 कोटी रुपये आहे.
सलमान खानला गाड्यांची फार आवड आहे. अभिनेत्याकडे 82 लाखांची मर्सिडीज बेंज, 13 कोटींची एस क्लास ऑडी A8 L, 1.5 कोटींची BMW X6 कारसह अन्य आलिशान आणि महागड्या कार आहेत.
सलमान खान Being Human नावाच्या ब्रँडचा मालक आहे. याशिवाय सलमानकडे एक यॉट असून त्याची किंमत 3 कोटी रुपये आहे.
सलमान खान काही स्टार्ट अप आणि रियल इस्टेटमध्येही गुंतवणूक करतो. सलमानचे नेटवर्थ 3 हजार कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे.