TMKOC मधील अभिनेत्री जेनिफर मिस्रीवर दु:खाचा डोंगर, भावाच्या मृत्यूनंतर आता लहान बहीण व्हेंटिलेटवर

| Published : Apr 13 2024, 09:15 AM IST / Updated: Apr 13 2024, 09:18 AM IST

Jennifer Mistry Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
TMKOC मधील अभिनेत्री जेनिफर मिस्रीवर दु:खाचा डोंगर, भावाच्या मृत्यूनंतर आता लहान बहीण व्हेंटिलेटवर
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

जेनिफर मिस्री बंसीवाल सध्या ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’चे निर्माते असित मोदी यांच्यासोबतच्या वादामुळे चर्चेत आहे . पण जेनिफर मिस्रीवर सध्या दु:खाचा डोंगर कोसळला गेलाय. अभिनेत्रीच्या भावाच्या मृत्यूनंतर आता लहान बहीण व्हेंटिलेटवर आहे.

Entertainment : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मालिकेमधील रोशन कौर सोढीची भूमिका साकारणऱ्या जेनिफर मिस्री बंसीवालाची (Jennifer Mistry Bansiwal) मालिकेचे निर्माते असित मोदी यांच्यासोबत वाद सुरू आहेत. यामुळेच जेनिफर सध्या चर्चेत आहे. पण जेनिफर खासगी आयुष्यात मोठ्या संकटांचा सामना करतेय. लहान भावाच्या मृत्यूनंतर आता जेनिफरच्या लहान बहिणीची प्रकृती नाजूक आहे. सध्या जेनिफरची बहीण व्हेंटिलेटवर आहे. याबद्दलची माहिती खुद्द जेनिफरने दिली आहे.

व्हेटिंलेटरवर बहीण
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट्सनुसार, जेनिफिरच्या लहान बहिणीची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. यामुळेच जेनिफर आपल्या घरी आली आहे. जेनिफरची बहीण व्हेंटिलेटरवर आहे. यामुळे बहीणीसोबत राहणे अत्यंत गरेजेचे असल्याचे जेनिफरने म्हटले आहे.

भावाच्या मृत्यूनंतर सात मुलींची जबाबदारी
गेल्या दीड वर्षांपासून जेनिफर मिस्री बंसीवाल कठीण काळाचा सामना करत आहे. जेनिफरने म्हटले की, लहान भावाच्या निधनानंतर माहेरच्या सात मुलींची जबाबदारी माझ्यावर आली आहे. याचवेळी असित मोदींसोबतचे वादाचे प्रकरणही सुरू आहे. या सर्व गोष्टी एकाचवेळी पाहणे मुश्किल झाले आहे. याच गोष्टींमुळे काही वर्षांपासून कठीण समस्यांचा सामना करत आहे.

असित मोदींसोबतचा वाद
जेनिफरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिला अद्याप कोणतेही नवे काम मिळालेले नाही. दुसऱ्या बाजूला जेनिफरने तारक मेहता का उल्टा चश्माचे निर्माते असित मोदी (Asit Modi) यांच्या विरोधातील लैंगिक शोषणाचा खटला जिंकला आहे. कोर्टाने असित मोदी यांना जेनिफरला पाच लाख रुपये नुकसान भरपाई देण्यासह शिल्लक थकबाकी देण्यास सांगितली आहे. पण अद्याप असित मोदी यांनी जेनिफरला नुकसान भरपाईची रक्कम दिलेली नाही.

आणखी वाचा : 

Netflix ने खरेदी केले अल्लू अर्जुनच्या Pushpa 2 चे अधिकार, इतक्या कोटींची झाली डील

अभिनेत्री रविना टंडन पाठोपाठ गोविंदाही घृष्णेश्वरचरणी नतमस्तक

Snake Venom Case : सापांसाठी वर्च्युअल क्रमांकावरून कॉल करायचा एल्विश यादव, पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशीटमधून धक्कादायक खुलासे