बॉलिवूड अभिनेते माजी खासदार गोविंदा अहुजा यांनी आज भगवान श्री. त्र्यंबकेश्वरच्या चरणी नतमस्तक होत आशिर्वाद घेतले. त्यांच्यासोबत त्यांचे बंधू किर्ती, मुलगा यश उपस्थित होते.
नुकतंच गोविंदाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला .
मी आजच्या दिवशी पक्षात प्रवेश करणे हा दैवी संकेत आहे. 14 वर्षाच्या वनवासानंतर जिथं रामराज्य आहे, त्याच पक्षात आलोय.
असे अनेक चित्रपट आहेत जे गोविंदाने नाकारले होते आणि नंतर ते चित्रपट बॉक्स ऑफिसवर अत्यंत यशस्वी ठरले हाेते. गदर एक प्रेमकथा, ताल, देवदास हे काही सिनेमे गोविंदाने रिजेक्ट केले होते.
काँग्रेस पक्षातून निवडणुकीमध्येत्याने भाग घेतला होता. ती निवडणूक त्याने जिंकली देखील होती. पण निवडणूक जिंकल्यानंतर त्याने एकदाही राजकीय नेता असण्याचे काम केले नव्हते.
रविना आणि तिच्या लेकीने संपूर्ण ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले आहे.
अखियों से गोली मारे फेम रविना आणि गोविंदा यांनी एकापाठोपाठ घृष्णेश्वराचे दर्शन घेतल्याने हि जोडी पुन्हा एकत्र येणार का ? अशी शंका वक्त केली जात आहे.