सार

निलेश साबळे यांचा चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम फार प्रसिद्ध होता. पण अचानक निलेश यांनी या कार्यक्रमातून बाहेर पडल्यामुळे हा कार्यक्रम चालेल का नाही हा प्रश्न निर्मात्यांच्या पुढे पडला आहे.

निलेश साबळे यांचा चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम फार प्रसिद्ध होता. पण अचानक निलेश यांनी या कार्यक्रमातून बाहेर पडल्यामुळे हा कार्यक्रम चालेल का नाही हा प्रश्न निर्मात्यांच्या पुढे पडला आहे. त्याच निलेश साबळे यांनी नवीन कार्यक्रम आणला असून त्याचे डिटेल्स त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून देण्यात आले आहेत. त्यांचा हा कार्यक्रम 27 एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

View post on Instagram
 

कार्यक्रमात कोण कोण आहे - 
या कार्यक्रमाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. आता या शोचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या कार्यक्रमाचे नाव हसतायना, हसायलाच पाहिजेहा शो घेऊन डॉ. निलेश साबळे यांचा लवकरच येणार आहे. या नवीन शोमध्ये ओंकार भोजने आणि भाऊ कदम हे असून ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची टीम येथे दिसून येत आहे. 

हा कार्यक्रम कधीपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार? - 
हसताय ना, हसायलाच पाहिजे या कार्यक्रमाचे लेखन डॉ. निलेश साबळे हे करत असून यामध्ये ओंकार भोजने आणि भाऊ कदम अशी दिग्गज कलाकारांची टीम आहे. अभिनेत्री सुपर्णा श्याम, स्नेहल शिदम आणि रोहित चव्हाण हे कलाकारदेखील या कार्यक्रमात दिसणार आहेत. येत्या 27 एप्रिलतारखेपासून शनिवार-रविवार रात्री नऊ वाजता हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
आणखी वाचा - 
Lok Sabha Election 2024 : अमरावतीत प्रचार सभेवरून वाद; सभेच्या मैदानावरुन आमदार बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये बाचाबाची
पुण्यातील कोचिंग सेंटरच्या 50 विद्यार्थ्यांना विषबाधा, रुग्णालयात दाखल; पोलिसांनी दिली ही मोठी अपडेट