- Home
- Entertainment
- मी 'या' अवतारात आली आहे, प्राजक्ता माळीचा 'हा' लूक पाहून प्रेक्षकांनी तोंडात घातली बोटं
मी 'या' अवतारात आली आहे, प्राजक्ता माळीचा 'हा' लूक पाहून प्रेक्षकांनी तोंडात घातली बोटं
अभिनेत्री प्राजक्ता माळी 'बाप तुझ्यापायी' या वेब सीरिजच्या प्रीमिअर सोहळ्याला विनामेकअप आणि साध्या शर्टमध्ये पोहोचली. तिने फोटोग्राफर्सना 'मी अवतारात आली आहे' असे म्हटले, ज्यानंतर तिच्या या लूकची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली.

मी 'या' अवतारात आली आहे, प्राजक्ता माळीचा 'हा' लूक पाहून प्रेक्षकांनी तोंडात घातली बोटं
प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्री असून तिच्याकडे प्रेक्षक मोठ्या आशेने पाहत असतात. तिने मालिका, चित्रपट, वेब सीरिजच्या माध्यमातून चाहत्यांची मने जिंकली आहेत. प्राजक्ताचा मोठा चाहता वर्ग देखील आहे.
फोटोग्राफर्सला प्राजक्ता काय म्हणाली?
यावेळी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये प्राजक्ता फोटोग्राफरला मी अवतारामध्ये आली आहे असं म्हणत असते. आता यावेळी नेमकं काय झालं ते आपण जाणून घेऊयात.
‘बाप तुझ्यापायी’ ही वेब सीरिजचा प्रीमिअर सोहळा पडला पार
बाप तुझ्यापायी या वेबसिरीजचा प्रीमियर सोहळा यावेळी पार पडला. त्यामध्ये प्राजक्ता माळी आली होती आणि तिने यावेळी कोणताही मेकअप केला नसल्याचं दिसून आलं.
प्राजक्ता माळी विनामेकअप दिसली
प्राजक्ता माळी यावेळी विनामेकअप दिसून आली. तिने साधं शर्ट घालून ती रेड कार्पेटवर आली होती. तिथं नेमकं काय घडलं आणि प्राजक्ता अशा अवतारात का आली होती हे आपण जाणून घेऊयात.
नेमकं काय झालं?
व्हिडीओमध्ये दिसत आहे की प्राजक्ता माळी ही पांढऱ्या रंगाचं सिंपल शर्ट घालून रेड कारपेटवर फोटोसाठी पोज देण्यासाठी उभी होती. तेव्हा ती हसत फोटोग्राफर्सला म्हणाली मी अवतारात आली आहे. तेथे उपस्थित असलेल्या मीडियाने तिच्या या लूकला देखील पसंती दर्शवली.
काही लोकांनी प्राजक्ताला केलं ट्रोल
यावेळी मात्र काही लोकांनी प्राजक्ताला ट्रोल केलं आहे. तिच्या या लूकने सर्वांचे लक्ष वेधले. सोशल मीडियावर प्राजक्ताचा हा लूक सध्या चर्चेत आहे. काहींनी तिच्या साधेपणाचे कौतुक केले.