- Home
- Utility News
- किंमत कमी, मायलेज जास्त.. 5 लाखांच्या आत टॉप 5 Maruti, Tata, Renault च्या दमदार कार!
किंमत कमी, मायलेज जास्त.. 5 लाखांच्या आत टॉप 5 Maruti, Tata, Renault च्या दमदार कार!
Top 5 Budget Friendly Maruti Tata Renault Cars in India : भारतात कमी बजेटमध्ये कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी, उत्तम मायलेज आणि आधुनिक फीचर्स असलेल्या पाच स्वस्त गाड्यांची यादी दिली आहे. पहिल्यांदा कार खरेदी करणाऱ्यांसाठी हे उत्तम पर्याय आहेत.

सर्वात स्वस्त गाड्या
तुम्हाला स्वतःची कार घ्यायची आहे, पण बजेट कमी आहे का? मग भारतात कमी किमतीत, उत्तम मायलेज आणि फीचर्ससह अनेक गाड्या उपलब्ध आहेत. भारतीयांचा उत्तम मायलेज असलेल्या कारकडे कल जास्त असतो. अशाच ५ लोकप्रिय गाड्यांची माहिती पाहूया. या ५ पैकी एक कार तुम्ही पसंत करु शकता. दिवाळी झाली असली तरी नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये डिस्काऊंटचा लाभ घेत खरेदी करु शकता.
टाटा टियागो
सुरक्षित आणि आरामदायी टियागोची किंमत ४.५७ लाखांपासून सुरू होते. ही पेट्रोलवर २० किमी/लिटर आणि सीएनजीवर २७ किमी/किलो मायलेज देते. नवीन ड्रायव्हर्ससाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
मारुती सुझुकी अल्टो के10
अल्टो K10 ही भारतातील एक लोकप्रिय आणि स्वस्त कार आहे. किंमत ३.६९ लाखांपासून सुरू. ही गाडी २४.५ किमी/लिटर मायलेज देते. यात ६ एअरबॅग्ज आणि स्मार्टप्ले इन्फोटेनमेंट सिस्टम आहे.
मारुती सुझुकी वॅगन आर
उंच डिझाइन आणि प्रशस्त इंटीरियर असलेल्या वॅगन आरची किंमत ४.९९ लाखांपासून सुरू होते. ही सीएनजीवर ३४ किमी/किलो मायलेज देते. रोजच्या प्रवासासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
मारुती सुझुकी सेलेरियो
सेलेरियोची किंमत ४.६९ लाखांपासून सुरू होते. ही पेट्रोलवर २६ किमी/लिटर आणि सीएनजीवर ३४ किमी/किलो मायलेज देते. यात ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आणि सहा एअरबॅग्ज आहेत.
रेनॉल्ट क्विड
एसयूव्ही लूक असलेल्या क्विडची किंमत ४.२९ लाखांपासून सुरू होते. ही २२ किमी/लिटर मायलेज देते. अँड्रॉइड ऑटो, डिजिटल क्लस्टर आणि जास्त ग्राउंड क्लिअरन्स ही याची वैशिष्ट्ये आहेत.

