सार

दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर अनेक अभिनेत्री बॉलिवूडमध्ये स्वतःच्या नशीब आजमावून पाहत असतात. त्यामध्ये अनेकींना यश आलं तर काही अभिनेत्री या परत दाक्षिणात्य सिनेमांकडे गेल्याच आपल्याला दिसून आलं.

दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर अनेक अभिनेत्री बॉलिवूडमध्ये स्वतःच्या नशीब आजमावून पाहत असतात. त्यामध्ये अनेकींना यश आलं तर काही अभिनेत्री या परत दाक्षिणात्य सिनेमांकडे गेल्याच आपल्याला दिसून आलं. यामध्येच एक नाव पूजा हेगडे हीच घ्यावं लागेल. पूजा हेगडेने बॉलिवूडमध्ये येऊन स्वतःचे बस्तान बसवले आणि ओळख तयार केली आहे. आता तिने मुंबईत एक फ्लॅट घेतला असून त्याची किंमत ऐकून तुम्ही तोंडात बोट घालाल. तिने चक्क मुंबईमध्ये समुद्राच्या कडेला महागडा असा फ्लॅट घेतला आहे. 

पूजाने कुठं घेतला फ्लॅट? - 
वयाच्या 33 व्या वर्षी पूजाने मुंबईत फ्लॅट घेतला असून तिने बांद्रा या उच्चभ्रू सोसायटीमध्ये सोसायटीचा फ्लॅट घेतला आहे. तिने एका जुन्या बंगल्याची खरेदी केली असून तिच्या आवडीनुसार तिने यामध्ये बदल केला आहे. चार हजार चौरस फुटांचा असणारा हा बांगला तिने तब्बल 45 कोटी रुपयांना खरेदी केला आहे.  पूजाचा समावेश आता बांद्रयामध्ये राहणाऱ्या सेलिब्रेटींच्या यादीत समावेश झाला आहे. 

पूजाने स्वतः बॉलिवूडमध्ये केली स्वतःची ओळख - 
पूजाने स्वतःच्या बॉलिवूड इंडस्ट्रीच्या करिअरची सुरुवात मोहेंजोदरो या चित्रपटातून केली. यानंतर ती काही हिंदी चित्रपटांमध्ये झळकली होती. तिने केलेल्या मोहेंजोदरो या चित्रपटातील भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं होते. त्यानंतर तिला काही चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. तिने त्या संधींचे सोने केले. 

अजून कोणी घेतला बांद्रयात बांगला - 
काही दिवसांपूर्वी अभिनेता जॉन अब्राहम यानेही एक बंगला खरेदी केला आहे. त्याने जवळपास 70 कोटींचा बंगला बांधण्याचे ठरवले आहे. मुंबईमध्ये घरांचे भाव वाढत असून बॉलिवूड मंडळी घर घेत आहेत. काही जण भाड्याने राहत असून काही जणांनी मुंबईतही घर घेण्याचं स्वप्न पाहिलं आहे. 
आणखी वाचा - 
अखेर ठरलं! धैर्यशील मोहिते सोलापूर लोकसभा मतदारसंघातून लढणार 'या' चिन्हावर, मोठ्या नेत्याच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
बोर्नव्हिटा शरीरासाठी घातक? सरकारने ई कॉमर्स कंपन्यांना बोर्नव्हिटाला हेल्थ ड्रिंक प्रकारातून काढण्याचे दिले आदेश