सार

Abhishek Bachchan on Divorce Rumors : ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्यात वाद सुरु असल्याच्या अफवा गेल्या काही काळापासून सुरु आहेत. अशातच अभिषेकने या सर्व गोष्टींवर मौन सोडले आहे.

Abhishek Bachchan on Divorce Rumors : बॉलिवूडमध्ये सध्या अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याची जोरदार चर्चा सुरु आहे. कपलबद्दल वेगवेगळ्या अफवा उडत आहेत. काहीजण असे म्हणतायत की, ऐश्वर्या राय बच्चन परिवारापासून वेगळी राहत आहे. यावर किती सत्य आहे याबद्दलच खुद्द अभिषेक बच्चनने उत्तर दिले आहे. नुकताच सोशल मीडियावर अभिषेक बच्चनचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिषेक ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटासंदर्भात बोलताना दिसून येत आहे. व्हायरल झालेला व्हिडीओ डीपफेक होता असे अभिनेत्याने म्हटले आहे. याशिवाय मी आजही विवाहितच आहे असेही अभिषेक म्हणाला.

अभिषेकचा डीपफेक व्हिडीओ
अभिषेक बच्चनच्या व्हायरल झालेल्या डीपफेक व्हिडीओमध्ये असे म्हटले जात होते की, त्याने ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय लेक आराध्याबद्दलही बोलले जात होते. यावर अभिषेक बच्चने संताप व्यक्त केला आहे. यावर उघडपणे बोलत अभिषेक म्हणाला या सर्व अफवा असून मी आजही ऐश्वर्यासोबत लग्नबंधनात आहे.

मी आजही विवाहित आहे- अभिषेक बच्चन
अभिषेक बच्चनने नुकत्याच बॉलिवूड UK मीडियासोबत संवाद साधताना म्हटले, मी आजही विवाहित आहे. माझ्याकडे तुम्हाला सांगण्यासारखे काही नाही. अत्यंत वाईट आहे की, काही गोष्टी वाढवून-चढवून सांगण्यात आल्या. हे ठिक आहे. आम्ही सेलिब्रेटी असल्याने आम्हाला हे मान्य करावे लागेल. व्हायरल झालेला व्हिडीओ आर्टिफिशिअल इंटेलिजेंसच्या मदतीने तयार करण्यात आला होता. दरम्यान, नुकत्याच काही दिवसांपूर्वी अभिषेक बच्चनला ऑलिम्पिंक स्पर्धेवेळी पाहिले गेले. यावेळचा अभिषेकचा व्हिडीओही समोर आला होता. यामध्ये अभिषेकने नीरज चोपडाची गळाभेट घेतली होती.

अनंत अंबानींच्या लग्नानंतर घटस्फोटाच्या चर्चांना उधाण
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायमधील घटस्फोटाच्या चर्चा अशावेळी सुरु झाल्या जेव्हा अनंत अंबानीच्या लग्नात बच्चन परिवारशिवाय अभिनेत्रीने लेकीसोबत एन्ट्री केली होती. यानंतरच कपलमध्ये सर्वकाही ठिक नाही अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. एवढेच नव्हे अभिषेक बच्चने घटस्फोटासंदर्भातील एक पोस्टही लाइक केली होती. यावरुन अधिकच घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, घटस्फोटाच्या अफवांवर अद्याप ऐश्वर्याकडून कोणताही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

अभिषेक बच्चनचा आगामी सिनेमा
अभिषेक बच्चन त्याचा आगामी सिनेमा किंगमध्ये झळकणार आहे. या सिनेमात अभिषेकसोबत शाहरुख खान आणि सुहाना खानही झळकणार आहे. ओटीटीनंतर आता सुहाना शाहरुखसोबत अ‍ॅक्शन सिनेमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे.

आणखी वाचा :

B-Town मधील या कलाकारांनी नाकारलेत हॉलिवूडच्या सिनेमांचे ऑफर

अभिषेक बच्चन-ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटासाठी एक डॉक्टर ठरलाय कारण?