सार

Singham again release date : अजय देवगणचा आगामी सिनेमा सिंघम अगेन सध्या जोरदार चर्चेत आहे. सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाले असून दिवाळीच्या मोक्यावर रिलीज होणार आहे. पण सिनेमाची रिलीज डेट पुन्हा पुढे ढकलली असे बोलले जात आहे.

Singham again release date : वर्ष 2024 च्या अखेरीआधी काही बडे सिनेमे बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहेत. यापैकीच एक म्हणजे ‘सिंघम अगेन’ सिनेमा आहे. या सिनेमाची प्रेक्षकांकडून आवर्जुन वाट पाहिली जात आहे. सिनेमात अर्जुन कपूर विलेनच्या भूमिकेत झळकणार आहे. काही दिवसांपूर्वी श्रीनगर येथील लाल चौक येथील सिनेमातील काही सीन लीक झाले होते. यामध्ये सिनेमाच्या क्लायमेक्सचा समावेश होता असे सांगितले जात होते. सिंघम अगेन सिनेमा दिवाळीवेळी रिलीज होणार असल्याची अधिकृत घोषणाही निर्मात्यांनी केली आहे. सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. आता प्रोडक्शनचे काम शिल्लक आहे. पण सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलल्याची पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. यामागील सत्य काय जाणन घेऊया...

अजय देवगणचा आगामी सिनेमा
अजय देवगणचा आगामी सिनेमा सिंघम अगेन याआधी 15 ऑगस्टला प्रदर्शित होणार होता. याच दिवशी अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 सिनेमाही रिलीज होणार होता. अशातच सिंघम अगेनचे निर्माते पुष्पा सिनेमावर नाराज झाल्याचे दिसून आले. यानंतर सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. याशिवाय टीमकडून कंन्फर्म करण्यात आले होते की, सिनेमाचे आतार्यंतचे काम पूर्ण झाले नव्हते. याच कारणास्तव सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली आहे.

सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलणार?
रोहित शेट्टीने आपल्या आगामी सिनेमाची पूर्ण तयारी केली आहे. कॉप युनिव्हर्सचा हा पाचवा सिनेमा असून सिंघम फ्रेंचाइजचा तिसरा इंस्टॉलमेंट आहे. वर्ष 2011 मध्ये सिंघम सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. वर्ष 2014 मध्ये सिंघम रिटर्न्स सिनेमानंतर तिसऱ्या भागासाठी 10 वर्षे लागली होती. वर्ष 2018 मध्ये सिंबा आणि वर्ष 2021 मध्ये सुर्यवंशी सिनेमा रिलीज झाला होता. दोन्ही सिनेमात अजय देवगणने बाजीराव सिंघमची भूमिका साकारली होती. आता लवकरच पाचवा सिनेमा येणार असून त्याची रिलीज डेट पुढे ढकलली जात असल्याचे रिपोर्ट्स समोर येत आहेत.

दरम्यान, सिंघम अगेन सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली जाणार नाही. तरण आदर्श यांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म X वर एक ट्विट शेअर केले आहे. यामध्ये तरण आदर्शने सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलणार असल्याची बातमी अफवा असल्याचे म्हटले आहे. सिनेमा दिवाळीतच रिलीज होणार असून अधिकृत तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे. सिनेमाचे शूटिंग नुकतेच पूर्ण झाले आहे. पोस्ट प्रोडक्शन शिल्लक असून त्याचे वेगाने काम सुरू आहे.

अजय देवगणच्या सिनेमाला कार्तिकच्या सिनेमाची टक्कर
यंदाच्या वर्षात अजय देवणगणचे तीन सिनेमे रिलीज झाले आहेत. यापैकीच एकच सिनेमा शैतानने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. ‘मैदान’ आणि ‘औरों में कहां दम था’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपटला गेला. ‘सिंघम अगेन’ सिनेमाकडून अजयला खू अपेक्षा होत्या. पण याच दिवशी कार्तिक आर्यनचा ‘भूल भुलैय्या-3’ सिनेमाही रिलीज होणार आहे.

आणखी वाचा : 

अखेर ठरलं! सलमान खानच करणार Bigg Boss 18 चे सूत्रसंचालन, या दिवशी होणार प्रीमियर

अंकिता लोखंडेच्या आलिशान घराचे 10 फोटोज, पाहून व्हाल अव्वाक