'कियारा अडवाणीला सिद्धार्थपासून धोका...',अभिनेत्याला वाचवण्याच्या नादात चाहत्याला घातला 50 लाखांचा गंडा

| Published : Jul 03 2024, 02:11 PM IST / Updated: Jul 03 2024, 03:21 PM IST

Sidharth and Kiara Advani

सार

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीच्या एका चाहत्याला दोन जणांनी 50 लाख रुपयांचा गंडा घातल्याची बातमी समोर आली आहे. खरंतर, सिद्धार्थ संदर्भातील एक बातमी सोशल मीडियावर शेअर करण्यात आली होती.

Exertainment : बॉलिवूडमधील कलाकारांना स्टार्स करण्यासाठी सोशल मीडियावरील फॅन क्लब्स खूप सपोर्ट करतात. पण काही फॅन क्लब्समध्ये देखील वाद असतात. अशाचप्रकारची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या (Sidharth Malhotra) एका चाहत्याने त्याच्याच पॅन पेजवर 50 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप लावला आहे.

सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म X वर मीनू वासुदेव नावाच्या हँडलने दावा केलाय की, अलीजा आणि हुस्ना परवीन नावाच्या दोन व्यक्तींनी तिला सिद्धार्थचा जीव धोक्यात असल्याचे सांगत तिच्याकडून चक्क 50 लाख रुपयांची फसवणूक केली आहे.

कियारामुळे सिद्धार्थचा जीव धोक्यात…
मीनूला फसवणूक करणाऱ्या दोघांनी सांगितले की, सिद्धार्थला त्याची पत्नी कियारा अडवाणीपासून धोका आहे. मीनूने म्हटले की, मी अमेरिकेत राहते आणि सदर घटना माझ्यासोबत ऑक्टोंबर ते डिसेंबर, 2023 दरम्यान घडली आहे.

मीनूने सोशल मीडिया हँडवलवरुन सिद्धार्थ मल्होत्रासंबंधित एक फॅन पेज Sidharth Malhotra News FC (@SidMalhotraNews) वर काही गंभीर आरोप लावले आहेत. मीनूने अलीजा नावाच्या व्यक्तीसोबतच्या चॅट्सचे स्क्रिनशॉट्स देखील शेअर केले आहे. यामध्ये मीनूने तिला कशाप्रकारे फसवले याची माहिती देखील दिली आहे.

नक्की काय घडले?
मीनूने घटनेची माहिती देत म्हटले की, मला सर्वकाही खोटं सांगण्यात आले. सिद्धार्थ मल्होत्राला कियारामुळे धोका आहे. याशिवाय कियाराने सिद्धार्थच्या परिवाराला जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्यासोबत जबरदस्तीने लग्न केले आहे.

एवढेच नव्हे मीनूला असेही सांगण्यात आले करण जौहर, शशांख खेतान आणि मनीष मल्होत्रासारखा सेलिब्रेटींनी या कामात कियाराची मदत केली आहे. अलीजाने मीनूची दिशाभूल करत तिला पटवून दिले की, सिद्धार्थसोबत कियाराने चॅट देखील केले आहे. त्याच्यावर काळी जादू करण्यासह अभिनेत्याचे बँक खातेही आपल्या कंट्रोलमध्ये केले आहे.

अशाप्रकारची कथा रचत फसवणूकदारांनी मीनूची फसवणूक केली. फसवणूक करण्यासाठी त्यांनी सिद्धार्थ मल्होत्राचा पीआर टीम मेंबर म्हणून आलेला बनावटी व्यक्ती दीपक दुबेशी ओखळ करुन दिली. मीनूची राधिका नावाच्या एका महिलेशी देखील ओखळ करुन दिली होती.

सिद्धार्थ मल्होत्राच्या नावावर फसवणूक
अलीजाला इनसाइड माहितीसाठी आणि सिद्धार्थसोबत बातचीत करण्यासाठी मीनू सातत्याने पैसे देत राहिली. खरंतर, मीनूची बनावट सिद्धार्थसोबत संवाद साधून दिला होता. मीनूने सिद्धार्थला गिफ्ट देण्यासाठी पैसे देखील दिले. पण नंतर कळले की, ते एक फोटोशॉप होते.

सिद्धार्थचे चाहते संतप्त
सिद्धार्थ मल्होत्राच्या चाहत्याची फसवणूक केल्यानंतर अन्यजणही संतप्त झाले आहेत. मीनूची मदत करण्यासाठी सातत्याने प्रत्येक चाहता पोस्ट शेअर करत आहे. याशिवाय सिद्धार्थ मल्होत्राला देखील पोस्टमध्ये टॅग करत आहे. जेणेकरुन सिद्धार्थच्या नावाखाली सुरु असलेल्या फसवणूकीबद्दल कळेल.

आणखी वाचा : 

अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्याआधी अंबानी परिवाराने धूमधडाक्यात लावले 50 जोडप्यांचे लग्न, पाहा PHOTOS

धुव्वादार कमाई करणाऱ्या Kalki 2898 AD सिनेमाच्या OTT रिलीज डेटमध्ये बदल, प्रेक्षकांना करावी लागणार आणखी प्रतिक्षा