सोनाक्षी आणि जहीरचे 23 जूनला लग्न होणार नाही? शत्रुघ्न सिन्हांनी केला या गोष्टींचा खुलासा

| Published : Jun 22 2024, 11:45 AM IST

sonakshi sinha

सार

Sonakshi-Zaheer Wedding Update : सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांच्या लग्नावर शत्रुघ्न सिन्हांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. याशिवाय शत्रुघ्न सिन्हांनी काही मोठे खुलासेही केले आहेत.

Sonakshi-Zaheer Wedding Update : सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल सध्या आपल्या लग्नामुळे चर्चेत आहेत. कपल येत्या 23 जूनला कोर्ट मॅरेज करणार असल्याची चर्चा आहे. याआधी दोघांच्या प्री-वेडिंग फंक्शनला सुरुवात झाली असून याचे फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. काही रिपोर्ट्सनुसार, सोनाक्षीचा परिवार तिच्या लग्नामुळे आनंदित नाही असे म्हटले जातेय. अशातच शत्रुघ्न सिन्हांनी एक मोठे विधान करत काही खुलासेही केले आहेत. शत्रुघ्न सिन्हांनी म्हटले की, येत्या 23 जूनला सोनाक्षी आणि जहीर लग्न करणार नाहीत. या दिवशी रिसेप्शन असणार आहे. यामध्ये सर्वजण सहभागी होतील.

काय म्हणाले शत्रुघ्न सिन्हा?
शत्रुघ्न सिन्हांनी म्हटले की, सर्वप्रथम जेव्हापासून तुमच्याशी मी अखेरचे बोललो तेव्हापासून ते आतापर्यंत काही गोष्टी बदलल्या गेल्यात. मी तुम्हाला संपूर्ण घटनाक्रमाबद्दल सांगू शकत नाही. कारण हे एक परिवारिक प्रकरण आहे. मी आणि माझी पत्नी 23 जूनला होणाऱ्या सेलिब्रेशनसाठी उपस्थितीत राहणार आहोत. खरंतर या दिवशी लग्न होणार नाहीये. रिसेप्शन होणार आहे.

शत्रुघ्न सिन्हांनी केले खुलासे
शत्रुघ्न सिन्हांनी पुढे म्हटले की, माझ्या परिवारातील कोणीही लग्नाबद्दल काहीही बोलले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, “केवळ गोष्टींचा अंदाज लावला जात आहे. अशा गोष्टीवर अधिक लक्ष केंद्रित केले जातेय, जो एक परिवाराशी संबंधित आहे. लग्न सर्वांच्याच घरी होतात. लग्नाआधी वाद होणे सामान्य बाब आहे. आम्ही सर्वजण ठिक आहोत. जे वाद होते ते मिटले आहेत.”

याशिवाय शत्रुघ्न सिन्हांना सोनाक्षीच्या लग्नाआधी परिवारीतील वादही मिटले आहेत का असेही विचारण्यात आले. यावर शत्रुघ्न सिन्हांनी म्हटले की, "प्रत्येक लग्नात असे होतेच. शत्रुघ्न सिन्हांची मुलगी आहे म्हणून तिला जे पाहिजे ते मिळू शकत नाही. खरंतर, आम्ही 23 जूनला फार मजा-मस्ती करणार आहोत."

आणखी वाचा : 

सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाआधी शत्रुघ्न सिन्हांनी घराला रोषणाई करत सजवला बंगला, पाहा PHOTOS

शत्रुघ्न सिन्हांनी घेतली जावयाची भेट, म्हणाले...