शाहरुख खानच्या मॅनेजरची सॅलरी ऐकून व्हाल थक्क, वेब सीरिजमधील कलाकारांपेक्षाही तिप्पट करते कमाई

| Published : Jun 12 2024, 11:08 AM IST

Pooja Dadlani Gurnani

सार

बॉलिवूडमधील कलाकारांचे मॅनेजर्स त्यांच्या एवढीच कमाई करतात. तुम्हाला माहितेय का, शाहरुखच्या मॅनेजरची कमाई वेब सीरिजमध्ये काम करणाऱ्या कलाकारांच्या कमाईच्या तिप्पट आहे. जाणून घेऊया शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीची वार्षिक कमाई किती याबद्दल सविस्तर...

SRK Manager Salary & Net Worth : बॉलिवूडमधील कलकारांचे काही मॅनेजर्स असे आहेत जे त्यांच्या प्रत्येक पावलावर त्यांच्यासोबत उभे राहतात. खरंतर, सिनेसृष्टीतील कलाकार रुपेरी पडद्यावर स्टार म्हणून झळकत असले तरीही ते खऱ्या आयुष्यात एका समान्य व्यक्तीसारखे वागतात. त्यांच्याही आयुष्यात संकटे, दु:ख येतात. यावेळी संपूर्ण मित्रपरिवार त्यांच्यासोबत उभा राहतो. पण तुम्हाला माहितेय का, शाहरुख खान (Shah Rukh Khan) मॅनेजर पूजा दललानीने (Pooja Dadlani) वेळोवेळी शाहरुखच्या प्रत्येक सुख-दु:खात त्याची साथ दिली आहे. अशातच पूजाची कमाई किती याची सध्या जोरदार सुरु आहे. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया....

बॉलिवूडमधील वजीर
शाहरुख खान बॉलिवूडचा किंग असला तर तरीही त्याच्या मॅनेजर पूजा ददलानीला त्याची वजीर मानली जाते. फार कमी वयातच सिनेसृष्टीत पाऊल ठेवलेली पूजा ददलानी शाहरुखसोबत गेली 21 वर्षे काम करत आहे. शाहरुखना स्टारडम मिळवून देण्यासाठी पूजाचाही मोलाचा वाटा आहे. एवढेच नव्हे शाहरुख खानच्या प्रत्येक पाऊलासोबत पूजा चालते.

पूजाचा शाहरुखसोबतचा प्रवास
पूजा ददलानी वर्ष 2012 मध्ये मुंबईत आली होती. पूजाने मास कम्युनिकेशनमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. पूजाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती शाहरुखचे काम सांभाळण्याव्यतिरिक्त त्याचे प्रोडक्शन हाउस रेड चिली एंटरटेनमेंट आणि आयपीएलमध्ये कोलकाता नाइट राइडर्सच्या टीमच्या व्यवसायाचे शेड्यूलिंग देखील मॅनेज करते. एवढेच नव्हे, घरात एखादी समस्या आल्यानंतरही पूजाने शाहरुखची वेळोवेळी साथ दिली आहे. खासकरुन, शाहरुखचा मुलगा आर्यन खानचे नाव ड्रग्ज प्रकरणात आल्यानंतर पूजा शाहरुखसोबत खंबीरपणे उभी राहिली होती.

पूजा ददलानीची कमाई
रिपोर्ट्सनुसार, आजकाल ‘पंचायत’ आणि ‘गुल्लक’ सारख्या वेब सीरिजमधील कलाकार संपूर्ण सीझनमध्ये कमाई करत नाही तेवढी कमाई शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी करते. पूजा ददलानी शाहरुखच्या परिवारातील महत्त्वाचा हिस्सा आहे. पूजाच्या कमाईबद्दल बोलायचे झाल्यास ती वर्षाला 7-9 कोटी रुपये कमावते. काही रिपोर्ट्सनुसार, प्रत्येक महिन्याला पूजा 60 लाख रुपये पगार घेते. अशातच पूजाच्या एकूणच नेटवर्थबद्दल बोलायचे झाल्यास रिपोर्ट्सनुसार, 45 ते 50 कोटी रुपये तिचे नेटवर्थ आहे.

पूजा ददलानीचे घर
पूजा ददलानीचे घर वांद्रे येथे असून तिच्या बंगल्याचे इंटीरियर गौरी खानने केले आहे. पूजाकडे एकापेक्षा एक उत्तम अशा कारचे कलेक्शनही आहे. दरम्यान, पूजा ददलानीचा विवाह हितेश गुरनानीसोबत वर्ष 2008 मध्ये झालाय. या दोघांना एक मुलगी आहे. शाहरुखचा लहान मुलगा अबराम आणि पूजाची मुलगी रेयना यांची एकमेकांसोबत उत्तम मैत्री आहे.

आणखी वाचा : 

सोनाक्षी सिन्हाने जहीर इक्बालसोबतच्या लग्नाच्या अफवांवर दिली संतप्त प्रतिक्रिया, म्हणाली....

'फायर है मैं...'; डेविड वॉर्नरचा 'पुष्पाराज' स्वॅग पाहून अल्लू अर्जुनने दिली अशी प्रतिक्रिया (Watch Video)