'फायर है मैं...'; डेविड वॉर्नरचा 'पुष्पाराज' स्वॅग पाहून अल्लू अर्जुनने दिली अशी प्रतिक्रिया (Watch Video)

| Published : Jun 12 2024, 07:38 AM IST / Updated: Jun 12 2024, 07:42 AM IST

David Warner Ad Puspharaj character

सार

अल्लू अर्जुनच आणि रश्मिका मंदानाचा आगामी सिनेमा ‘पुष्पा-2’ ची मोठ्या उत्साहाने वाट पाहिली जात आहे. अशातच पुष्पाचा नेहमीच चाहता राहिलेल्या डेविड वॉर्नरने देखील पुष्पा स्टाइलमध्ये आपला स्वॅग दाखवला आहे.

David Warner’s Pushpa Swag : साउथ सिनेमातील प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) ‘पुष्पा-2’ सिनेमा सध्या जबरदस्त ट्रेण्डमध्ये आहे. सिनेमा प्रदर्शित होण्यासाठी प्रेक्षकांना वाट पहावी लागणार आहे. अशातच प्रेक्षक आणि अल्लू अर्जुनच्या चाहत्यांमध्ये आतापासूनच पुष्पाराजची धूम पाहायला मिळत आहे. सिनेमातील दमदार डायलॉग्स किंवा गाण्यावर प्रत्येकजण आपापल्या स्टाइलने व्हिडीओ कंटेट सोशल मीडियावर सादर करत आहेत. अशातच क्रिकेटर आणि पुष्पाचा नेहमीच चाहता राहिलेल्या डेविड वॉर्नरने देखील पुष्पाराजचा स्वॅग दाखवला आहे.

डेविड वॉर्नरचा ‘पुष्पाराजचा स्वॅग’
ऑस्ट्रेलिया संघातील क्रिकेटर डेविड वॉर्नरवर अल्लू अर्जुनच्या सिनेमांचा मोठा चाहता आहे. याआधी देखील डेविडने पुष्पामधील डायलॉग्सवर रिल्स तयार करुन इंस्टाग्रामवर शेअर केली होती. आता पुष्पाराजचा स्वॅग डेविडने दाखवत एक व्हिडीओ शेअर केला आहे. हाच व्हिडीओ पाहून अल्लू अर्जुनला आपले हसू आवरता आलेले नाहीये.

View post on Instagram
 

अल्लू अर्जुनने दिली अशी प्रतिक्रिया
डेविड वॉर्नरची एक जाहिरात आहे. यामध्ये डेविड पुष्पाराज स्टाइलमध्ये गुंडांना आपला जलवा दाखवताना दिसून येत आहे. यावरच अल्लू अर्जुनने प्रतिक्रिया देत हसण्याचे इमोजी, फायर साइन आणि थम्स अप देत डेविड वॉर्नरच्या परफॉर्मेन्सचे कौतुक केले आहे.

पुष्पा-2 सिनेमातील गाण्यांचा प्रेक्षकांवर फिवर
सिनेमाच्या निर्मात्यांनी अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या पुष्पा-2 मधील 'अंगारो' गाणे प्रदर्शित केले होते. या गाणाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. येत्या 15 ऑगस्टला सिनेमा सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होण्यास पूर्णपणे तयार आहे.

आणखी वाचा : 

Kalki 2898 AD सिनेमातील 9 प्रमुख कलाकार, ओखळणेही होतेय मुश्किल

'आजकाल मुलं परवानगी घेत नाही, केवळ...', सोनाक्षी-जहीर इक्बालच्या लग्नाबद्दल शत्रुघ्न सिन्हांनी केले धक्कादायक विधान