सार

रुबीना दिलैके काही महिन्यांआधी दोन गोंडस मुलींना जन्म दिला आहे. यानंतर आता पुन्हा रुबीना कामावर परतली आहे. याच दरम्यान, रुबानाने एका मुलाखतीत सध्या तिला कोणत्या प्रकारच्या भूमिकेसाठी विचारले जातेय याबद्दल भाष्य केले आहे.

Entertainment : अभिनेत्री रुबीना दिलैकचा तिच्या आयुष्यातील नवा अध्याय सुरु झाला आहे. रुबीनाने अलीकडेच दोन गोंडस मुलींना जन्म दिला आहे. रुबीनाने वर्ष 2023 मध्ये नोव्हेंबर महिन्यात जुळ्या मुलींचे घरी स्वागत केले. एकीचे नाव ईधा आणि दुसरीचे नाव जीवा ठेवले आहे. अशातच रुबीना आता पुन्हा एकदा कामावर परतली आहे. यादरम्यान, रुबीना सर्वप्रथम आपल्या फिटनेसकडे लक्ष दिले.

रुबीनाचा शो
रुबीनाचा युट्यूबवरील शो च्या तिसऱ्या सीजनमध्ये पहिली पाहुणी म्हणून बहीण रोहिणी आली होती. आता शो मध्ये शरद केळकर आला होता. शरद केळकरसोबत संवाद साधताना रुबीनाने म्हटले की, आई झाल्यानंतर मला मुख्य अभिनेत्रीएवजी भाभीच्या भूमिकेसाठी विचारले जात आहे. शरद केळकरने रुबीनाच्या आई झाल्यानंतरच्या फिटनेसबद्दल कौतुक केले. यावर रुबीना म्हणाली की, आता मला भाभीच्या भूमिकेसाठी विचारले जातेय. यावेळी शरद केळकरनेही आपल्या खऱ्या आयुष्यातील एका बाबाचा प्रवास कसा असतो याबद्दल सांगितले.

View post on Instagram
 

रुबानीच्या कामाबद्दल थोडक्यात
रुबीनाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास सध्या ती कोणत्याही टेलिव्हिजन शो चा हिस्सा नाही. अखेरचे रुबीनाला एंटरटेनमेंट की रात हाउसफुलचे सूत्रसंचालन करताना पाहिले होते. याशिवाय खतरों के खिलाडी आणि झलक दिखला जा मध्ये देखील रुबीना दिसली होती. सध्या रुबीना सिनेमात झळकणार असून यंदाच्यात वर्षात तो रिलीज होणार आहे.

आणखी वाचा : 

बॉलिवूड अभिनेत्रीच्या वडिलांनी केली उडी मारून आत्महत्या, सकाळीच घडली घटना

या 5 कलाकारांकडे आहे सर्वाधिक Luxury Watches, खरेदी कराल आलिशान घर