क्रिकेटर शुभमन गिल डिसेंबरमध्ये रिद्धिमा पंडितसोबत विवाह करणार? TV अभिनेत्री म्हणाली...

| Published : Jun 01 2024, 10:54 AM IST

Ridhima Pandit breaks silence on Shubman Gill wedding rumours
क्रिकेटर शुभमन गिल डिसेंबरमध्ये रिद्धिमा पंडितसोबत विवाह करणार? TV अभिनेत्री म्हणाली...
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

भारतीय क्रिकेट संघातील खेळाडून शुभमन गिलच्या लग्नाच्या बातम्या सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या दोघांचे डिसेंबरमध्ये लग्न होणार असल्याचे बोलले गेले. यावरच टेलिव्हिजनवरील अभिनेत्री रिध्दिमा पंडितने स्पष्टीकरण दिले आहे.

Shubman Gill Wedding News :  टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री रिद्धिमा पंडितचे (Ridhima Pandit) नाव शुभमन गिलसोबत जोडले गेले. पण रिद्धिमा आणि शुभमन गिल विवाह करणार येथवर बातम्या वेगाने पसरल्या गेल्या. अशातच रिद्धिमाने शुभमन गिलसोबतच्या विवाहाच्या बातम्यांवर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर अशी बातमी आली होती की, डिसेंबत महिन्यात रिद्धिमा आणि शुभमन गिल एकमेकांसोबत लग्नगाठ बांधणार आहेत. पण अभिनेत्रीने स्पष्टीकरण देत लग्नाच्या बातम्यांना पूर्णविराम दिला आहे.

काय म्हणाली रिद्धिमा?
रिपोर्ट्सनुसार, रिद्धिमाने इंस्टाग्रामवरील स्टोरीत एक व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये रिद्धिमा म्हणतेय की, "आज काही पत्रकारांचे मला माझ्या लग्नासंदर्भात फोन आले. पण लग्न कोणाचे? मी लग्न करत नाहीये. आयुष्यात लग्न करण्याची योग्य वेळ आल्यास मी सर्वांना स्वत:हून याबद्दल सांगेन. पण सध्याच्या माझ्या लग्नासंदर्भातील बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही."

रिद्धिमाबद्दल बोलायचे झाल्यास, ती टेलिव्हिजनवरील एक प्रसिद्धा अभिनेत्री आहे. 'हमारी बहू रजनीकांत' आणि 'खतरा-खतरा' सारख्या शोमध्ये रिद्धिमा झळकली आहे. याशिवाय बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सीझनमध्येही रिद्धिमा कंटेस्टेंट म्हणून दिसली होती.

टेलिव्हिजन इंडस्ट्रीची पोलखोल
गेल्या काही दिवसांपूर्वी रिद्धिमाने टेलिव्हिजनच्या सेटवर गैरवर्तवणूकीबद्दलच्या मुद्द्यावर भाष्य केले होते. अभिनेत्रीने म्हटले होते, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे की टेलिव्हिजनच्या सेटवर कोणीही गैरवर्तवणूकीबद्दल बोलत नाही. पण यावेळी रिद्धिमाने कोणाचेही नाव घेतले नव्हते. पण एका घटनेचा उल्लेख करत म्हटले होते की, तिच्या शो च्या एका कार्यकारी निर्मात्याने रिद्धिमाला रुग्णालयात आजारी असलेल्या माझ्या आईला भेटण्यास नकार दिला होता.

शुभमन गिल आणि रिलेशनशिपच्या चर्चा
भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू शुभमन गिलची नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणास्तव चर्चा होते. आता रिद्धिमा पंडितमुळे पुन्हा शुभमन गिल चर्चेत आला आहे. याआधी सारा अली खान आणि सारा तेंडुलकरसोबत शुभमन गिलचे नाव जोडण्यात आले होते. दरम्यान, शुभमन गिल केवळ 24 वर्षांचा असून रिद्धिमा पंडित 33 वर्षांची आहे. या दोघांमध्ये 9 वर्षांचे अंतर आहे.

आणखी वाचा : 

Mr & Mrs Mahi Day 1 Collection : जान्हवीच्या सिनेमाने कमावले एवढे CR

मलायका अरोरा-अर्जुन कपूरचे ब्रेकअप, अभिनेत्रीने क्रिप्टिक पोस्ट शेअर करत म्हटले....