सार

रणबीर कपूरचा आणि सई पल्लवीची मुख्य भूमिका असलेला रामायण सिनेमाच्या शुटींगला सध्या सुरुवात झाली आहे. पण हा सिनेमा सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते जाणून घ्या प्रकरण काय. 

रणबीर कपूरचा आगामी चित्रपट रामायण कायदेशीर अडचणीत अडकल्याचे दिसत आहे. नितीश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या या चित्रपटाच्या शूटिंगला नुकतीच सुरुवात झाली. त्याच्या सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असताना एक दावा करण्यात आला त्यामुळे आता रामायण चित्रपट कायदेशीर कारवाईच्या भोवऱ्यात सापडला आहे.

अहवालात म्हटले आहे की, अल्लू मंटेना मीडिया व्हेंचर्स एलएलपीचा दावा आहे की 'प्रोजेक्ट रामायण'चे अधिकार त्यांच्याकडेच राहतील आणि प्राइम फोकस टेक्नॉलॉजी लिमिटेड किंवा इतर कोणत्याही संस्थेद्वारे स्क्रिप्ट किंवा सामग्रीचा कोणताही वापर त्यांच्या कॉपीराइटचे उल्लंघन होईल. प्राईम फोकस टेक्नॉलॉजी लिमिटेडला 'प्रोजेक्ट रामायण' मटेरियलमध्ये कोणतेही अधिकार किंवा मालकी नसल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे. गरज पडल्यास आपल्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा निर्मिती कंपनीने दिला आहे.

रामायणावर कायदेशीर कारवाईची शक्यता :

प्राइम फोकस टेक्नॉलॉजी लिमिटेडसोबत या मुद्द्यावर चर्चा सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच पैश्यांच्या व्यवहारासंदर्भात देखील चर्चा सुरु आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार एप्रिल महिन्यात देखील पैश्यांवर चर्चा झाली होती मात्र ती निष्फळ ठरली होती. अल्लू मंटेना मीडिया वेंचर एलएलपीचा दावा आहे की, या सिनेमाचे सगळे अधिकार त्यांच्याकडे आहेत आणि यावर कोणत्याही दुसऱ्या प्रोडक्शन हाऊसचा अधिकार असणार नाही.

निर्मात्यांकडून कोणतेही उत्तर नाही :

कायदेशीर कारवाई होत आहे की नाही, किंवा अल्लू मंटेना मीडिया वेंचर एलएलपी यांच्या आरोपावर अजून पर्यंत निर्मात्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

या प्रकरणाचा चित्रीकरण बसणार फटका :

चित्रपटाच्या कॉपीराईट इश्यूमुळे चित्रीकरणावर फटका बसणार असल्याचे सांगितले जात आहे.पण अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाहीये. पण आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की, या सिनेमाचे निर्माते यावर काय पावलं उचलणार.

आणखी वाचा :

30 वर्षांचा जस्टिन बीबर होणार पिता, हेली बीबरचा बेबी बंप असलेला फोटो शेअर करत सांगितली गोडं बातमी !

70+ असलेल्या या बॉलीवूड मॉम्सचे फिटनेस सिक्रेट काय ? जाणून घ्या

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर प्राजक्ता माळीने केलं निर्मिती क्षेत्रात पदार्पण...पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली खुशखबर !