सार

नितेश तिवारी यांचा रामायण हा चित्रपट अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होऊन भव्य प्रकल्पावर कामाला सुरुवात झाली आहे.

नितेश तिवारी यांचा रामायण हा चित्रपट अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होऊन भव्य प्रकल्पावर कामाला सुरुवात झाली आहे. यामध्ये रामाची भूमिका यश करणार असून अभिनेत्रीची भूमिका साई पल्लवी करणार आहे. रणबीर, सई आणि यशसह सर्वच कलाकार या चित्रपटात काम करणार असून त्यांच्या फी बद्दलची नवीन माहिती समोर आली आहे. 

तुम्हाला या चित्रपटात ‘या’ तिघांनी किती फी घेतलीय माहित आहे का? 
रामायण चित्रपटात सई पल्लवीला सात कोटी रुपयांची फी देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये तिच्यासोबतच अभिनेते म्हणून रणबीर कपूर आणि यश या दोघांना घेण्यात आले आहे. यशने या चित्रपटासाठी 50 कोटी घेतले असून रणबीर कपूरने या चित्रपटासाठी 75 कोटी घेतल्याचे सांगण्यात येत आहे. एकूणच या दोन अभिनेत्यांपेक्षा सई पल्लवीने खूपच कमी फी घेतली आहे. 

रामायण चित्रपटाबद्दल - 
अलीकडेच काही दिवसांपूर्वी रामायण चित्रपटातील इतर अभिनेते आणि अभिनेत्रींचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्यात आले आहेत. त्यामध्ये अरुण गोयील हे राजा दशरथ आणि लारा दत्ता कैकियाच्या भूमिकेत आपल्याला दिसत आहे. यामध्ये रामायणातील सर्वच भूमिका दिसून येणार असून त्यामध्ये बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार काम करणार असल्याची माहिती समजली आहे. 
आणखी वाचा - 
Maharashtra Weather : राज्यात वादळी वाऱ्यासह गारपीटचा इशारा ! या जिल्ह्यांना अलर्ट जारी
ऋतुराज गायकवाडने धोनीला आधी फलंदाजीस पाठवायला हवे होते, माजी फलंदाजांनी केले मत व्यक्त