सार

राज्यात तापमानवाढी सोबत आता वादळी वाऱ्याचा देखील फटका बसणार आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात 12 तारखेपर्यंत वादळी वाऱ्यासह अवकाळी पासवाचा तडाखा बसणार आहे

पुणे : राज्यात सध्या भयंकर तापमान वाढ झाली आहे मात्र आता त्यासोबत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा देखील फटका बसणार आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात १२ तारखेपर्यंत वादळी वाऱ्यासह अवकाळी पासवाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पुढील पाच ते सात दिवस तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भात वादळी वारे, वीजांचा कडकडाटासह गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भात यलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार काल पूर्व विदर्भापर्यंत असलेली वाऱ्याची द्रोणिका रेषा आज विदर्भ मराठवाडा अंतर्गत कर्नाटक व तमिळनाडू पर्यंत जात आहे. पुढील पाच ते सात दिवस हवामान कोरडे राहील. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पुढील पाच ते सात दिवस तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विदर्भामध्ये आज हवामान कोरडे असेल व त्यानंतर 12 तारखेपर्यंत काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात रात्री उकडा जाणवणार आहे. व कोकण गोव्यामध्ये वातावरण उष्ण व दमट राहणार आहे. पुढील दोन-तीन दिवस विदर्भामध्ये तुरळ ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. तसेच तुरळक ठिकाणी गारा पडण्याची देखील शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे विदर्भामध्ये काही जिल्ह्यांना आठ व नऊ तारखेला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे.

राज्यातील सर्वाधिक तापमान या शहरात :

राज्यात सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक 42.3 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. विदर्भात चंद्रपूर, ब्रम्हपुरी, वर्धा, अमरावती येथे तापमान 41 डिग्री सेल्सिअसच्या पुढे होते. राज्यात काही जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, असा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आणखी वाचा:

नाशिक लोकसभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय घेणार निर्णय? हेमंत गोडसे यांना बोलावले वर्षा बंगल्यावर

या अटी- शर्थींसह भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी शोमा सेन यांना मिळाला जामीन...वाचा सविस्तर

सुप्रिया सुळेंचा प्रचार करणाऱ्या इंदापूरच्या उद्योजकाच्या घरी देवेंद्र फडणवीस यांची धावती भेट, बारामती लोकसभेची गणित बदलणार?