फँड्री सिनेमातून प्रसिद्धी मिळालेली राजेश्वरी खरात हिने तिच्यासोबत घडलेल्या कास्टिंग काऊचच्या स्थितीचा उलगडा केला आहे.अभिनेत्रीने दिग्दर्शकाने कशा पद्धतीची वागणूक केली याबद्दलचा खुलासाही तिने केला.

Rajeshwari Kharat on her casting couch : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री राजेश्वरी खरात हिने अलीकडे दिलेल्या मुलाखतीत आपल्या कडव्या अनुभवांची उकल केली आहे. फँड्री या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणाऱ्या राजेश्वरीला देखील मनोरंजन क्षेत्रात काम करताना कास्टिंग काऊचचा त्रास सहन करावा लागला आहे. राजश्री मराठी या माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत तिने स्पष्ट शब्दांत हा अनुभव शेअर केला.

“मी नाही येऊ शकत... मला वेळ लागेल”

राजेश्वरी खरात म्हणाली की, गार्गी ताईंनी मला आधीच सांगितलं होतं की इंडस्ट्रीत असे काही वाईट अनुभव येऊ शकतात. एकदा मी एका प्रोजेक्टच्या स्क्रिप्ट रिहर्सलसाठी गेले असताना, एका दिग्दर्शकाचा मला कॉल आला. त्यांनी विचारलं, "तू कुठे आहेस?" मी सांगितलं की, रिहर्सलसाठी आले आहे. ते म्हणाले, "माझ्या स्टुडिओला ये." मी स्पष्टपणे सांगितलं की, "आता मी येऊ शकत नाही, मला वेळ लागेल."

“तुला विचारायचं नाही, तुला इथं आलंच पाहिजे”

त्यानंतर त्या दिग्दर्शकाने खूप दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटलं, "तू मला विचारायचं नाही, काय काम आहे. मी सांगितलं की, तू इथं आली पाहिजेस." राजेश्वरी म्हणाली की, अशा अनुभवामुळे मी दुसऱ्या दिग्दर्शकांसमोर रडायला लागले. त्यांनी मला समजावलं की अशा गोष्टी होत असतात. तसंच ‘कॉम्प्रोमाईज’संबंधीही काहीजण सरळ विचारतात, जे पूर्णपणे चुकीचं आहे.

"मी स्पष्टपणे सांगितलं की, मी असं काही करत नाही"

राजेश्वरी खरात हिने अशा प्रकारांवर ठाम भूमिका घेत स्पष्टपणे सांगितलं की, "मी असं काही करत नाही." तिने यास विरोध करत स्वतःचा आत्मसन्मान जपला.

रिप्लेसमेंटचा अनुभवही शेअर

पुढे बोलताना तिने मालिकांमध्येही काम करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. मात्र, अनेकदा ती सिलेक्ट होऊन देखील रिप्लेस झाल्याचं ती म्हणाली. “माझ्यामागे कोणतं मोठं बॅनर किंवा नाव नसल्यामुळे असं होतं. मला याचं दुःख नाही, मी यामधून शिकते आहे,” असं ती म्हणाली.