‘पुष्पा 2: द रूल’ :अल्लू अर्जुनने पोस्टर शेअर करत वाढवली चाहत्यांमधील उत्सुकता

| Published : Apr 03 2024, 01:29 PM IST

Pushpa 2 The Rule Teaser

सार

‘पुष्पा 2: द रूल’ या पोस्टरसह चित्रपटाच्या निर्मात्यांनी टीझरच्या रिलीजची तारीखही जाहीर केली आहे. लवकरच प्रेक्षकांना मोठे सरप्राईज मिळणार आहे.जाणून घ्या केव्हा रिलीज होणार पुष्प 2

एंटरटेनमेंट डेस्क : साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन याचा बहुप्रतीक्षित पुष्पा 2: द रुल'साठी बऱ्याच दिवसांपासून याविषयीच्या चर्चा रंगल्या आहेत.त्याच प्रमाणे चित्रपटाचे छोटे छोटे अपडेट देखील प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत आहे. अशातच अल्लू अर्जुनने त्याचा इंस्टाग्रामवर चाहत्यांना खुश खबर दिली असून पुष्पा 2 च्या टिझर लाँच बाबत अपडेट दिली आहे. त्यामुळे आता चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासे झाला आहे.

2 एप्रिल 2024 रोजी चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले आहे.या चित्रपटाची वाट पाहणाऱ्या चाहत्यांच्या उत्साहात भर घातली आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी मंगळवारी चित्रपटाचे एक नवीन पोस्टर शेअर केले आहे. ज्यामध्ये एका पायाचा क्लोज-अप शॉट दिसत आहे. या पायात घुंगरू बांधलेले असून, संपूर्ण पायाला सिंदूर लावलेले दिसत आहे. त्यामुळे यावरून अंदाज लावता येतो कि अल्लू अर्जुन नव्या आणि हटके भूमिकेत पाहायला मिळणार आहे.तसेच 8 एप्रिल 2024 रोजी टिझर लाँच होणार असून चित्रपटाची तारीख 15 ऑगस्ट 2024 सांगण्यात येत आहे.

View post on Instagram
 

कधी रिलीज होणार टीझर!

‘पुष्पा 2: द रूल’ या पोस्टरसह चित्रपटाच्या निर्मात्यांनी टीझरच्या रिलीजची तारीखही जाहीर केली आहे. 2 एप्रिल रोजी अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाच्या खास मुहूर्तावर मोस्ट अवेटेड चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होणार असल्याचे या पोस्टरमध्ये लिहिले आहे. ट्वीटरवर या चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना चित्रपटाच्या निर्मात्यांनी लिहिले, 'चला 'पुष्पा मास जत्रा' सुरू करूया. बहुप्रतिक्षित 'पुष्पा 2: द रुल'चा टीझर 8 एप्रिल रोजी दुप्पट ताकदीने येत आहे. हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदाना देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ती ‘पुष्पा’च्या पत्नीची भूमिका साकारत आहे. ‘पुष्पा 2: द रुल’ 15ऑगस्टला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यात समंथा रुथ प्रभूही कॅमिओमध्ये दिसू शकते. या चित्रपटात संजय दत्तचीही खास भूमिका असण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा :

‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ ; कलर्स मराठी वाहिनीवर नव्या मालिकेतून येताय विनोदाचे हे तीन हुकमी एक्के

महाराष्ट्राच्या 'वहिनींची' आवडच न्यारी, जेनेलियाला आवडतो घरचा ठेचा

Navri Mile Hitlerla : रेवतीचा जीव वाचवण्यासाठी अभिराम हिटलर करणार लीलाची मदत ?पहा आजच्या एपिसोडमध्ये