‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ ; कलर्स मराठी वाहिनीवर नव्या मालिकेतून येताय विनोदाचे हे तीन हुकमी एक्के

| Published : Apr 03 2024, 11:42 AM IST

nilesh sabale new show
‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ ; कलर्स मराठी वाहिनीवर नव्या मालिकेतून येताय विनोदाचे हे तीन हुकमी एक्के
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

‘चला हवा येऊ द्या’मधून घरा घरात पोहोचलेले निलेश साबळे यांनी कलर्स मराठी वाहिनीवर नवीन शो ची घोषणा केली आहे. जाणून घ्या काय आहे शो चं नाव आणि कोणते कलाकार यात काम करणार आहेत.

एंटरटेनमेंट डेस्क : ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ या नव्या कार्यक्रमातून विनोदाचे हे तीन हुकमी एक्के प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. हा नवा कार्यक्रम ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. या विनोदी कार्यक्रमाचं लेखन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन अशी संपूर्ण धुरा म्हणजेच कॅप्टन ऑफ द शीप असणार आहेत निलेश साबळे.

“हसताय ना…हसायलाच पाहिजे”, असं म्हणत घराघरात पोहोचलेले लोकप्रिय निवेदक, अभिनेते, दिग्दर्शक निलेश साबळे यांनी ‘झी मराठी’वरील ‘चला हवा येऊ द्या’ मधून काही महिन्यांपूर्वी ब्रेक घ्यायचा म्हणून एक्झिट केले. त्यानंतर ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला. गेली १० वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत असलेल्या हा कार्यक्रम बंद होणार असल्याची चर्चा गेल्या वर्षभरापासून सुरू होती. अखेर काही दिवसांपूर्वी ‘चला हवा येऊ द्या’ हा लोकप्रिय विनोदी कार्यक्रम ऑफ एअर झाला. पण आता निलेश साबळे, भाऊ कदम व ओंकार भोजनेसह महाराष्ट्राच्या रसिक प्रेक्षकांना पुन्हा एकदा खळखळून हसवण्यासाठी येत आहेत.

View post on Instagram
 

निलेश साबळे, भाऊ कदम व ओंकार भोजने यांचा नवा विनोदी कार्यक्रम ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ २० एप्रिलपासून सुरू होणार आहे. दर शनिवार-रविवार रात्री ९ वाजता पाहायला मिळणार आहे.

कोण कोण झळकणार?

या नव्या कार्यक्रमासाठी सगळेच आतुर झाले असून, या नव्या कार्यक्रमातून काय नवीन पाहायला मिळणार याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ या कार्यक्रमात निलेश साबळे, भाऊ कदम, ओंकार भोजने यांच्या सोबतच अभिनेत्री सुपर्णा श्याम, स्नेहल शिदम आणि अभिनेता रोहित चव्हाण हे कलाकार देखील दिसणार आहेत. तर, अलका कुबल आणि भरत जाधव हे दोन दिग्गज कलाकार या कार्यक्रमात पाहुणे परीक्षक पदाची धुरा सांभाळताना दिसणार आहेत.

आणखी वाचा :

महाराष्ट्राच्या 'वहिनींची' आवडच न्यारी, जेनेलियाला आवडतो घरचा ठेचा

Navri Mile Hitlerla : रेवतीचा जीव वाचवण्यासाठी अभिराम हिटलर करणार लीलाची मदत ?पहा आजच्या एपिसोडमध्ये

प्रिया बापट आणि उमेश कामतचा 'गुलाबी साडी आणि....' गाण्यावरील भन्नाट डान्स व्हायरल (Watch Video)

Top Stories