सार

रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा हे नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत राहतात. त्यांचं लव्ह मॅरेज झाले असून महाराष्ट्रासोबतच संपूर्ण देशात त्यांचा फॅन बेस आहे

रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा हे नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत राहतात. त्यांचं लव्ह मॅरेज झाले असून महाराष्ट्रासोबतच संपूर्ण देशात त्यांचा फॅन बेस आहे. ते दोघेही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असून तिथे ते व्हिडीओ टाकत असतात. त्यामुळे मराठी लोक याठिकाणी मोठ्या प्रमाणावर कमेंट करतात. मोठे सेलिब्रेटी मोठ्या प्रमाणावर बाहेर खातात असा सर्वसामान्यांचा समज असतो. 

View post on Instagram
 

जेनेलियाला काय आवडते? 
जेनेलिया देशमुखला काय आवडते याबाबत तिने कर्ली टेल्स या चॅनेलला मुलाखत दिली असून यामध्ये तिने मिरची ठेचा आवडत असल्याचं म्हटलं आहे. पाणीपुरी आवडते असं म्हणाला होता. तसेच लातूरला गेल्यावर ती ठेचा, भाकरी, पिठलं-भाकरी, शेंगदाण्याची चटणी, काळ्या मसाल्याची आमची या पदार्थांवर ताव मारते असंही रितेश म्हणाला होता.

आपण घरच्या घरी ठेचा कसा बनवू शकता? 
- हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करुन घ्यावे.

- एका पॅनमध्ये तेल गरम करुन त्यात हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे, लसूण आणि शेंगदाणे घालून ते भाजून घ्यावे.

- पॅनमधील मिश्रण थंड झाल्यानंतर ते खलबत्यात ठेचून घ्यावे.

- तिखटपणा कमी करण्यासाठी वरुन लिंबाचा रस घालावा.
आणखी वाचा - 
पतंजलीला जाहिरातीच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने दिली चेतावणी, बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण होते हजर
तुमच्याकडे दोन हजारांच्या नोटा आजही आहेत? RBI च्या या 19 कार्यालयांमध्ये आजपासून करू शकता डिपॉझिट