सार

प्रसिद्ध संगीत सम्राट उस्ताद राशिद खान यांचे मंगळवारी (09 जानेवारी) वयाच्या 55 व्या वर्षी निधन झाले आहे. रुग्णालयात राशिद खान यांच्यावर उपचार सुरू होते.

Ustad Rashid Khan Demise :  दिग्गज संगीत सम्राट उस्ताद राशिद खान यांचे मंगळवारी निधन झाले आहे. राशिद खान यांनी वयाच्या 55 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. उस्ताद राशिद खान प्रोस्टेट कॅन्सरच्या (Prostate Cancer) आजाराचा सामना करत होते.

राशिद खान यांच्यावर कोलकातामधील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. राशिद खान यांना व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. डॉक्टरांनी राशिद खान यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला पण त्यांचे निधन झाले.

राशिद खान यांच्यावर उपचार सुरू असणाऱ्या रुग्णालयातील एका अधिकाऱ्याने म्हटले की, आम्ही राशिद यांचा जीव वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांचे निधन झाले. दुपारी 3 वाजून 45 मिनिटांनी राशिद खान यांचे निधन झाले.

ममता बॅनर्जींनी व्यक्त केला शोक 
राशिद खान यांच्या निधनानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शोक व्यक्त केला आहे. ममता बॅनर्जी यांनी म्हटले की, “हे संपूर्ण देशाचे आणि संपूर्ण संगीत जगताचे मोठे नुकसान आहे. मी खूप दु: खी आहे. मला अजूनही विश्वास बसत नाही की राशिद खान यांचा मृत्यू झालाय.”

सेरेब्रल अटॅकनंतर राशिद खान यांची प्रकृती अधिक बिघडली
उस्ताद यांना गेल्या महिन्यात सेरेब्रल अटॅक (Cerebral Attack) आल्यानंतर त्यांची प्रकृती अधिक बिघडली गेली. सुरुवातीला राशिद खान यांच्यावर टाटा मेमोरियल कॅन्सर रुग्णालयात उपचार सुरू होते. यानंतर उस्तादांना कोलकातामधील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सूत्रांनुसार, गेल्या महिन्यात खासगी रुग्णालयात भरती झाल्यानंतर राशिद खान यांची प्रकृती बिघडली गेल्याची माहिती दिली आहे.

राशिद खान यांचा उत्तर प्रदेशातील जन्म
उत्तर प्रदेशातील बदायू (Badau) येथे जन्मलेले राशिद खान हे उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे पुतणे होते. राशिद खान यांनी गायनाची सुरुवातीला ट्रेनिंग आजोबा उस्ताद निसार हुसैन खान यांच्याकडून घेतली होती. राशिद खान उस्ताद-रामपुर-सहसवान घराण्याचे गायक होते. वयाच्या 11व्या वर्षी त्यांनी पहिला स्टेज परफॉर्मेन्स दिला होता.

या सिनेमांसाठी दिला होता आवाज
उस्ताद राशिद खान यांनी शाहिद कपूर आणि करिना कपूर यांचा सिनेमा 'जब व्ही मेट'मधील 'आओगे जब तुम' गाण्यासाठी आपला आवाज दिला होता. या गाण्याला खूप जणांनी पसंत केले होते. याशिवाय 'माय नेम इज खान', 'राज 3', 'मंटो' आणि 'शादी मे जरूर आना' सारख्या सिनेमांसाठीही राशिद यांनी आपला आवज दिला होता.

आणखी वाचा : 

KGF स्टारचे बॅनर लावताना तीन चाहत्यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू, अभिनेत्याने दिली मृतांच्या परिवाला भेट

हॉलिवूड कलाकार क्रिश्चियन ओलिव्हरचा विमान अपघातात मृत्यू, अभिनेत्याच्या दोन मुलींनीही गमावला जीव

Hit And Run प्रकरणात अडकले गेलेत हे बॉलिवूड सेलेब्स