सार

ओटीटी प्लॅटफॉर्मवरील वेबसीरिज पंचायतच्या तिसऱ्या सीजननंतर आता चौथ्या सीजनची वाट पाहिली जात आहे. अशातच चौथा सीजन कधी रिलीज होणार यासंदर्भात एक मोठे अपडेट समोर आले आहे.

Panchayat Season 4 Update : पंचायत सीरिज ओटीटीवरील सर्वाधिक पसंत करण्यात आलेल्या वेब सीरिजपैकी एक ठरली आहे. आतापर्यंत सीरिजचे तीन सीजन प्रदर्शित करण्यात आले आहेत. या सीरिजला प्रेक्षकांनीही भरभरुन प्रतिसाद दिला. पंचायतमधील सचिव जी असो किंवा प्रधान सीरिजमधील प्रत्येक पात्राच्या भूमिकेने प्रेक्षकांवर आपली छाप पाडली आहे. अशातच आता सीरिजच्या चौथ्या सीजनची वाट पाहिली जात आहे. यावरच एक मोठे अपडेट समोर आले आहे.

पंचायत-4 कधी रिलीज होणार
दिग्दर्शक दीपक कुमार यांनी आधीच खुलासा केला होता की, पंचायतच्या चौथ्या आणि पाचव्या सीजवर काम करण्यास सुरुवात केली आहे. लेखकांनी स्क्रिप्ट्सवर काम सुरु केलेयं. पंचायतच्या चौथ्या सीरिजबद्दलच्या नव्या अपडेटबद्दल रिपोर्ट्सनुसार, निर्मात्यांकडून मान्सून पूर्ण होण्याची वाट पाहिली जात आहे. याशिवाय नवभारत टाइम्सच्या एक्सक्लूसिव्ह रिपोर्ट्सनुसार, नवा सीजन वर्ष 2026 मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पंचायच्या चौथ्या सीजन कधी रिलीज होणार याबद्दल अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. याशिवाय सीरिजचे शूटिंग ऑक्टोंबर 2024 मध्ये मध्य प्रदेशात सुरू होण्याची शक्यता आहे.

पंचायत-4 ची कथा
पंचायत-3 मध्ये जितेंद्र कुमार, सांविका, नीना गुप्ता, रघुवीर यादव असे कलाकार झळकले होते. गेल्या तिन्ही सीजनमध्ये फुलेरा गावात प्रधान पदासाठी सुरु असणारी चढाओढ दिसून आली. नव्या सीजनची कथा निवडणुकीच्या मुद्द्यावर असणार आहे. याशिवाय रिलीजमध्ये रिंकी आणि सचिव जी यांच्या रिलेशनशिपबद्दल काय होणार हे देखील पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. याशिवाय प्रल्हाद निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की नाही हे देखील पहावे लागेल.

शो मध्ये आणखी मजा आणण्यासाठी निर्मात्यांकडून कथित रुपात नव्या कलाकारांना आणण्याची शक्यता आहे. गेल्या दोन सीजनमध्ये नव्या सांसदबद्दल बोलले जात होती. त्यांनीही सीजन-4 मध्ये घेण्याची शक्यता आहे. याशिवाय सीजन-3 चे लोकगीत नव्या सीरिजसाठी रिक्रिएट केले जाऊ शकते. सध्या पंचायतच्या चौथ्या सीजनची प्रेक्षकांकडून आतुरनेते वाट पाहिली जात आहे. याचा नवा सीजन अन्य सीजनप्रमाणे ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडीओवर स्ट्रीम होईल.

आणखी वाचा : 

Stree-2 सिनेमाने 15 दिवसात मोडले हे 8 रेकॉर्ड्स, ऐकून व्हाल हैराण

अक्षय कुमारनंतर आता आर माधवनचा पान मसाल्याच्या जाहिरातीसाठी नकार