प्रिया बापट आणि उमेश कामतचा 'गुलाबी साडी आणि....' गाण्यावरील भन्नाट डान्स व्हायरल (Watch Video)

| Published : Apr 02 2024, 12:15 PM IST / Updated: Apr 02 2024, 12:34 PM IST

Priya Bapat and Umesh Kamat

सार

मराठी सिनेसृष्टीतील गोड कपल म्हणून ओखळ असलेल्या प्रिया बापट आणि उमेश कामत यांचा एक डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये प्रिया आणि उमेशने ‘गुलाबी साडी आणि...’ गाण्यावर डान्स केला आहे. 

Gulabi Sadi Viral Video : सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्मवर दररोज नवे ट्रेण्ड येतात. याच ट्रेण्डच्या माध्यमातून काहींना प्रसिद्धी मिळते. अशातच सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म युट्यूबवर सध्या 'गुलाबी साडी आणि लाली लाल लाल' (Gulabi Sadi Ani Lali Lal Lal) गाणे फारच ट्रेण्ड होतय. याचे व्हिडीओ, रिल्स किंवा स्टेट्सही युजर्स ठेवतायत. या गाण्याची भुरळ सोशल मीडियावरील युजर्सच नव्हे सिनेसृष्टीतील कलाकारांनाही पडली आहे.

मराठी सिनेसृष्टीतील गोड कपल म्हणून ओखळ असणारी अभिनेत्री प्रिया बापट  (Priya Bapat) आणि अभिनेता उमेश कामत (Umesh Kamat) यांनी देखील ‘गुलाबी साडी आणि लाली लाल लाल’ गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. या दोघांच्या डान्सचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

प्रिया बापट आणि उमेशचा भन्नाट डान्स व्हायरल
प्रिया आणि उमेशने 'गुलाबी साडी आणि लाली लाल लाल' गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. यासाठी प्रियाने गुलाबी रंगातील साडी नेसली असून उमेशनेही पांढऱ्या रंगातील सदऱ्यावर गुलाबी रंगातील जॅकेट परिधान केले आहे. या डान्सचा व्हिडीओ कपलने सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये प्रिया आणि उमेश दोघेही फार सुंदर दिसत असून त्यांचे डान्समधील हावभावही चेहऱ्यावर हास्य उमटवणारे आहेत.

View post on Instagram
 

या दोघांच्या डान्सच्या व्हिडीओवर कमेंट्सही करण्यात आल्या आहेत. अनेकांनी प्रिया आणि उमेशच्या डान्सचे कौतुक केले आहे. याशिवाय तुमची जोडी फार सुंदर असल्याचेही एका युजरने म्हटले आहे.

गुलाबी साडी गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ
Sanju Rathod SR नावाच्या युट्युबवरील चॅनलवर 'गुलाबी साडी आणि लाली लाल लाल' गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्याला 28 दशलक्ष व्हूज मिळाले आहेत. याआधीही या युट्यूबवरील 'नऊवारी पाहिजे' गाणे फार गाजले होते.

आणखी वाचा : 

हॉलिवूडमधील या अभिनेत्रीने खरेदी केला ईशा अंबानीचा आलिशान बंगला

महेश मांजरेकरांनी केली नव्या चित्रपटाची घोषणा; आजच्या ज्वलंत परिस्थितीवर येणार नवा चित्रपट

1300 Cr ची संपत्ती आणि एअरलाइन्सचा मालक आहे हा साउथ अभिनेता