सार

'नवरा माझा नवसाचा' सिनेमाचा दुसरा भाग तब्बल 19 वर्षांनंतर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन सचिन पिळगावकर करत असून त्यांच्यासोबत जेष्ठ अभिनेते अशोक सराफ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसून येणार आहेत.

Navra Mazha Navsacha 2 :  मराठी सिनेसृष्टीतील विनोदी सिनेमा 'नवरा माझा नवसाचा' दुसरा भाग तब्बल 19 वर्षांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास येणार आहे. सिनेमासंदर्भातील एक पोस्ट अभिनेता स्वप्निल जोशी (Swapnil Joshi) याने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये स्वप्निलने म्हटलेय की, "19 वर्षांनंतर येतोय ‘नवरा माझा नवसाचा 2’ गणपती बाप्पा मोरया! 🙏🏼 Shoot begins 🎬" याशिवाय सिनेमाचे दिग्दर्शन सचिन पिळगावकर करणार असल्याचेही अभिनेत्याने पोस्टमध्ये लिहिले आहे.

स्वप्निल जोशीची इंस्टाग्राम पोस्ट
नवरा माझा नवसाचा सिनेमाच्या दुसऱ्या भागाचे शूटिंग सुरू झाल्याचे स्वप्निल जोशी याने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. सिनेमा 19 वर्षांनी येतोय असेही पोस्टमध्ये लिहण्यात आले आहे. याशिवाय सिनेमातील स्टारकास्ट कोण असणार याची माहिती देखील देण्यात आली आहे.

View post on Instagram
 

स्वप्निलच्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
नवरा माझा नवसाचा’ सिनेमाचा दुसरा भाग येणार असल्याने नेटकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. स्वप्निलने शेअर केलेल्या पोस्टखाली सिनेमाबद्दलच्या प्रतिक्रिया दिल्या जात आहे. एकाने म्हटले की, "खूप शुभेच्छा आणि खूप प्रेम," दुसऱ्याने म्हटले, "गणपती बाप्पा मोरया." याशिवाय अन्य एकाने म्हटले," Wow चला ना गडे.... नव्या भागासाठी अधिक उत्सुक आहे. " 'नवरा माझा नवसाचा 2' सिनेमाच्या पोस्टखाली मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी देखील आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सिनेमातील स्टारकास्ट
‘नवरा माझा नवसाचा 2’ सिनेमात जेष्ठ अभिनेते अशोक सराफ, सुप्रिया पिळगावकर, स्वप्निल जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत, निवेदिता सराफ, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव आणि संतोष पवार असे कलाकार झळकणार आहेत.

'नवरा माझा नवसाचा' सिनेमा
सिचन पिळगावर यांनी दिग्दर्शित केलेला ‘नवरा माझा नवसाचा’ सिनेमा वर्ष 2004 मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. या सिनेमाने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले होते. याशिवाय सिनेमातील गाणी, डायलॉगही आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत.

आणखी वाचा : 

रामानंद सागर यांची 'Ramayan' मालिका पुन्हा होणार प्रसारीत, DD National ने जाहीर केली तारीख आणि वेळ

साउथ सुपरस्टार थलापति विजयची राजकरणात एण्ट्री, स्वत: च्या राजकीय पक्षाची केली घोषणा

Ashok Saraf : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर, CM एकनाथ शिंदेंची घोषणा